Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंतरराष्ट्रीय चित्रपट बाजारपेठेत मराठी चित्रपटांचा वाजणार डंका!

Webdunia
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018 (11:25 IST)
‘बोगदा’,’सविता दामोदर परांजपे’ आणि ‘टेक केअर गूडनाईट’ हे चित्रपट फिल्मीदेशमुळे जाणार सातासमुद्रापार..!
 
मराठी चित्रपटांना सातासमुद्रापार नेऊ पाहणाऱ्या ‘फिल्मीदेश’ या उपक्रमामुळे मराठी चित्रपटसृष्टीचा डंका आता जगभर वाजणार आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते नतीन केणी आणि मनीष वशिष्ट यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या ‘फिल्मीदेश’ उपक्रमान्वये, भारताबाहेरील रसिकांपर्यंत बहुसंख्य प्रमाणात मराठी सिनेमे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती आहे. मात्र विदेशातील वितरण निर्बंधनामुळे हवे तितक्या प्रमाणात प्रादेशिक सिनेमे तिकडच्या स्थानिक लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे, परदेशातील मराठी प्रेक्षकांसाठी त्यांच्या जवळच्या सिनेमागृहात मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणार आहे. याच उपक्रमांतर्गत, प्रदर्शनाच्या वाटेवर असलेली ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बोगदा’ आणि ‘टेक केअर गुडनाईट’ हे तीन मराठी चित्रपट पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय चित्रपट बाजारपेठेत उतरवली जात आहेत.
 
चित्रपट मनोरंजन क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे नितीन केणी यांचा 'फिल्मीदेश' हा उपक्रम मराठी सिनेमांसाठी भविष्यात सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना नितीन केणी यांनी आपले मत व्यक्त करताना, '१० - १५ वर्षापूर्वी मराठी सिनेमे महाराष्ट्रातसुद्धा नीट जायचे नाही. ते जत्रेत आणि काही थियेटरमध्ये दाखवले जायचे, सरकाच्या मदतीने मग याला चालना मिळाली. आता महाराष्ट्रात मराठी सिनेमा फोर्स बनला आहे, त्यांना चांगले दिवस आले आहेत. आज मराठी सिनेमांना चांगले थियेटर्स आणि शोज उपलब्ध होत आहेत. चार पाच वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'काकस्पर्श' नंतर मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस आले असून, 'नटसम्राट', 'सैराट' आणि 'दुनियादारी' सारखे सिनेमे जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे ते सुपरहिट झाले. इतकेच नव्हे तर, त्यामुळे मराठी चित्रपटाच्या आर्थिक सुबत्तेत वाढ झाली आहे. विदेशातदेखील अगदी हीच प्रक्रिया या उपक्रमाद्वारे राबवण्याचा आमचा मानस आहे.' असे त्यांनी सांगितले. नितीन केणी यांचे बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील निर्मिती आणि वितरणक्षेत्रात मोठे योगदान आहे. गदर, रुस्तम, लंचबॉक्स यांसारख्या हिंदीतील सुप्रसिद्ध सिनेमांसाठी आणि सैराट, नटसम्राट,  कट्यार काळजात घुसली, दुनियादारी, टाइमपास, लयभारी यांसारख्या सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच ते झी स्टुडियोचे माजी सीईओ असून, 'झी स्टुडियो' ला नव्या उंचीवर नेण्यास त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यामुळे, मराठी चित्रपटसृष्टीची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी ‘फिल्मीदेश’ द्वारे त्यांनी उचलेले हे धाडसी पाऊल खरंच कौतुकास्पद आहे.
 
शिवाय, या कार्यात जागतिकस्तरीय 'बृहन्महाराष्ट्र मंडळ' चा कार्यभाग सांभाळणारे बीएमएमचे चेअरमन आशिष चौघुले यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले आहे. ‘फिल्मीदेश’ द्वारे प्रदर्शित होणाऱ्या सर्व चित्रपटांचे विदेशी प्रसारण आशिष चौघुले पार पाडणार आहेत. 'फिल्मीदेश' बद्दल बोलताना आशिष चौघुले असे सांगतात कि, 'भारतात आज विविध माध्यमांद्वारे सहजरीत्या मराठी सिनेमे उपलब्ध होतात. पण भारताबाहेरील मराठी प्रेक्षकांना ते शक्य होत नाही. कारण, हे सर्व सिनेमे विदेशात येईपर्यंत अनेक महिने उलटून गेलेली असतात. शिवाय, मर्यादित वितरणामुळे आणि प्रसारणामुळे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतदेखील नाही. त्यामुळे इच्छा असूनदेखील मराठी चित्रपटांपर्यंत विदेशातील मराठी प्रेक्षक पोहोचू शकत नसल्यामुळे, त्यांच्यासाठी हा 'फिल्मीदेश' उपक्रम सोईचा ठरणार आहे'. 
 
'फिल्मीदेश' या उपक्रमाची नांदी ‘बोगदा’, ‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘टेक केअर गुडनाईट’ या तीन मराठी सिनेमांपासून होणार आहे. हे सिनेमे 'फिल्मीदेश' द्वारे जगभरात दाखवले जाणार असून, या सिनेमांच्या वितरणाबरोबरच जनसंपर्क आणि प्रसारमाध्यमाचे कार्यदेखील याअंतर्गत पार पाडले जाणार आहे. भविष्यातील इतर मराठी चित्रपटांचा विदेशी प्रचारदेखील याचपद्धतीने केला जाणार असून, याद्वारे, चित्रपटांच्या निर्मात्यांची गुंतवणूकदेखील सत्कारणी लागणार आहे. तसेच यामुळे मराठी चित्रपटसृष्टीचा आर्थिक व्यवहार नव्या उंचीवर जाण्यास मदत होणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टची तिकिटे काही मिनिटांतच विकली,मुंबईत या तारखेला आहे कॉन्सर्ट

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

प्राचीन भीष्मकनगर किल्ला अरुणाचल प्रदेश

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत होणार वेगळे, घटस्फोटाचा निर्णय या दिवशी येणार

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

पुढील लेख
Show comments