rashifal-2026

मीडियम स्पाइसीमध्ये झळकणार राधिका आपटे, व्हिडिओ झाला लिक!

Webdunia
बुधवार, 15 जून 2022 (13:55 IST)
सध्या सगळीकडेच मराठी चित्रपट ‘मीडियम स्पाइसी’ची जोरदार चर्चा आहे. ललित प्रभाकर, सई ताम्हणकर आणि पर्ण पेठे यांची मुख्य भूमिका असलेला 'मीडियम स्पाइसी' पुन्हा एकदा चर्चेत आलाय, तो म्हणजे चित्रपटातील लीक झालेल्या एका सीनमुळे! आणि विशेष म्हणजे या सीनमध्ये चक्क आपल्या सर्वांची लाडकी राधिका आपटे दिसतीये. ललित आणि राधिका एका हॉटेलमध्ये बसून गप्पा मारत आहेत, असा हा सीन असून, राधिका नक्की कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार याची चर्चा होत आहे. राधिका तब्बल आठ वर्षांनी पुन्हा एकदा मराठी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित टाकळकर व राधिका यांनी यापूर्वी मराठी प्रायोगिक नाटकांमध्ये एकत्र काम केले आहे. राधिका पुन्हा एकदा मराठी चित्रपटात दिसणार असल्याने तिचे चाहते या चित्रपटाची वाट बघत आहेत. 
 
प्रसिद्ध निर्मात्या विधि कासलीवाल यांची निर्मिती असलेल्या "मीडियम स्पाइसी" या चित्रपटाच्या माध्यमातून सुविख्यात नाटककार मोहित टाकळकर मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, इरावती कर्णिक लिखित आयुष्यात हव्या असलेल्या गोष्टींचा समतोल साधत मध्यममार्गाचा मागोवा घेणारा "मीडियम स्पाइसी" येत्या १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

फातिमा सना शेखने बिकिनी घालून तलावात उडी मारली, चाहत्यांसोबत तिचा अनुभव शेअर केला; व्हिडिओ व्हायरल

श्रीदत्त क्षेत्र आत्मतीर्थ पांचाळेश्वर

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले

मी लग्न करेन... श्रद्धा कपूरने लग्नाबद्दल स्पष्टपणे सांगितले

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकाचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments