suvichar

मराठी सिल्व्हर-‘राजन’ लवकरच

Webdunia
शनिवार, 1 जुलै 2017 (10:41 IST)
रिदम मुव्हीज प्रस्तुत वंश एंटरप्राईजेस यांची निर्मिती असलेला ‘राजन’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. भरत सुनंदा दिग्दर्शित आणि लिखित या सिनेमाच्या ‘राजन’ ह्या शीर्षकामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. मुंबईत होत असलेल्या या सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून, हा सिनेमा नेमका कशावर आधारित आहे, हे लवकरच लोकांना समजणार आहे. असे असले तरी, या सिनेमाच्या शीर्षकावरून हा सिनेमा ९० च्या दशकात मुंबईत राज्य करणारा ‘छोटा राजन’ वर आधारित असल्याचे बोलले जात आहे. तुर्तास, याबाबत कोणतीच अधिकृत बातमी समोर आली नसली तरी, या सिनेमाच्या टिजर पोस्टरचा आवाज सोशल साईटवर ऐकायला मिळत आहे. या सिनेमाच्या पहिल्या टिजर पोस्टरवर पोलीस कोठडीचे चित्र दिसत असून, नुकतेच प्रदर्शित झालेल्या दुसया पोस्टरवर 'वॉन्टेड' या अद्याक्षराच्या खाली सिहांची प्रतिकृती दिसत असल्यामुळे, हा सिनेमा तत्कालीन मुंबईतील गुंडगिरीवर भाष्य करणारा आहे, असा अंदाज येतो.
या सिनेमाबद्दल सांगताना दिग्दर्शक भरत सुनंदा यांनी, 'राजन' हा सिनेमा वास्तविक जीवनावर बेतला असल्याचे सांगितले. 'प्रेक्षकांनी हा सिनेमा एक मनोरंजनाचा भाग म्हणून पहावा. १९८३ ते १९९३ सालातली मुंबई आणि त्यावेळचा गँगवाॅर आजच्या पिढीलासुद्धा कळले पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा असून, त्यावेळी मी जे काही पाहिले आणि बातम्यातून जाणले, तेच मी माझ्या लेखणीतून मोठ्या पडद्यावर सादर केले आहे' असे ते स्पष्ट करतात. तसेच, हा 'राजन' हा सिनेमा कोणाच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित नसून, त्याकाळच्या परीस्थीला प्रेरित होऊन बनवलेला सिनेमा आहे, ज्यात सिनेमाचा नायक हा 'राजन' आहे, असे देखील ते पुढे स्पष्टीकरण देतात.    

‘राजन’ या सिनेमाचे सुरेखा पाटील, दिप्ती बनसोडे आणि वामन पाटील यांनी निर्मिती केली असून, तुषार पटेल यांनी कार्यकारी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. या सिनेमातील स्टारकास्टबाबत सध्या गुप्तता पाळण्यात आली असून, लवकरच मराठीच्या सिल्व्हर स्क्रिनवरचा हा ‘राजन’ नेमका कोण, हे सर्वांसमोर येणार आहे. आगामी ‘राजन’ हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित होत असलेल्या मराठी सिनेमांच्या यादीत एक नवा थरार घेऊन येईल, हे नक्की! 
 
सर्व पहा

नक्की वाचा

बाहुबलीची अभिनेत्री अनुष्का शेट्टी अडकणार लग्नबंधनात

धुरंधर २: द रिव्हेंजच्या कलाकारांचे मानधन समोर आले, रणवीर सिंगने सर्वाधिक रक्कम घेतली

MANN-PISHACH केवळ ३३ हजार रुपये आणि दोन कलाकारांच्या मदतीने ८० मिनिटांचा चित्रपट कसा बनला?

मराठी चित्रपट “अभया”चा पहिला पोस्टर प्रदर्शित !ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेडची दमदार प्रस्तुति !

अक्षय कुमार-प्रियदर्शन जोडीने धुमाकूळ घातला, 'भूत बंगला 'च्या टीझरने यूट्यूबवर 55 दशलक्ष व्ह्यूज ओलांडले

सर्व पहा

नवीन

नोरा फतेहीने ‘त्या’ गाण्याबाबत सोडलं मौन

Dhuranthar: The Revenge Review धुरंधर: द रिव्हेंज चित्रपट परीक्षण रणवीर सिंगची स्फोटक शैली, धडकी भरवणारा सूडाचा प्रवास

Doraemon Director Dies कर्करोगामुळे डोरेमोनच्या दिग्दर्शकांचे निधन, जाणून घ्या याची कारणे आणि लक्षणे

गुढी पाडवा २०२६: बॉलिवूड अभिनेत्रींकडून पैठणी साडी स्टाईलची प्रेरणा घ्या

कमी बजेटमध्ये 2 दिवसांची ट्रिप कुठे प्लॅन कराल?

पुढील लेख
Show comments