Festival Posters

Timepass.3- ‘अनन्या’ची जिद्द जागवणार ‘तू धगधगती आग’

Webdunia
मंगळवार, 12 जुलै 2022 (15:46 IST)
प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘तू धगधगती आग’ हे स्फूर्तीदायी गाणे झळकले असून या जबरदस्त  गाण्याला बॅालिवूडचे सुपरहिट गायक विशाल ददलानी यांचा भारदस्त आवाज लाभला आहे. अभिषेक खणकर यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला समीर साप्तीस्कर यांनी संगीत दिले आहे.
 
 आयुष्यातील एका कठीण प्रसंगावर मात करत ‘अनन्या’ जिद्दीने आणि खंबीरपणे लढत असल्याचे यात दिसतेय. ‘शक्य आहे. तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे.’ या टॅगलाईनचा अर्थ यातून स्पष्ट होत असून प्रचंड ऊर्जेने भरलेले हे गाणे आहे.
 
दिग्दर्शक प्रताप फड या गाण्याबद्दल म्हणतात, “या गाण्याची खासियत म्हणजे ज्यांनी बॅालिवूडला एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली अशा विशाल ददलानी यांनी हे गाणे गायले आहे. विशेष म्हणजे हे गाणे विशाल यांनी गाताना खूपच एन्जॉय केले. त्यामुळे त्यांचातील या सकारात्मक लहरी यात गाण्यात आपसूकच आल्या आहेत. हे गाणे अधिकच बळ देणारे बनले.’'
 
निर्माता रवी जाधव म्हणतात, '' हे गाणे अतिशय प्रेरणा देणारे असून या गाण्याची संगीत टीम अतिशय तगडी आहे. विशाल ददलानी यांनी आपल्या आवाजाने या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. यातील प्रत्येक गाणे काहीतरी सांगत आहे. त्यामुळे ही गाणी श्रोत्यांना अधिक भावतील.''
 
एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट, ड्रीमव्हीवर एन्टरटेन्मेंट व रवी जाधव निर्मित या चित्रपटाचे लेखन प्रताप फड यांनी केले आहे. ध्रुव दास, रवी जाधव व संजय छाब्रिया निर्मित ‘अनन्या’ येत्या २२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण ही थंड हवेची ठिकाणे कौटुंबिक सहलींसाठी उत्तम

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला

पुढील लेख
Show comments