Festival Posters

चित्तथरारक 'जजमेंट'

Webdunia
बुधवार, 17 एप्रिल 2019 (10:18 IST)
ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित 'जजमेंट' या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या  चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. २० सेकंदाच्या या टिझरमध्ये मंगेश देसाई, तेजश्री प्रधान आणि माधव अभ्यंकर यांची झलक दिसते. 'माझ्या जीवाला धोका आहे इथे', रडवेल्या आवाजात ऐकू येणारा हा संवाद आणि मंगेश देसाई यांचे कधीही न पाहिलेले रूप चित्रपटाबद्दलचे कुतूहल अधिकच वाढवत आहेत. शिवाय या चित्रपटामध्ये मंगेश देसाई प्रथमच खलनायकाची भूमिका करत असल्यामुळे त्यांच्या अभिनयाची आजपर्यंत कधीही न पाहिलेली एक वेगळी बाजू रसिकांना पाहायला मिळणार आहे.
हा चित्रपट नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' या कादंबरीवर आधारित आहे. निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण ह्यांची ओळख आहे.
 
या चित्रपटाचे निर्माता डॉ. प्रल्हाद खंदारे आणि सह निर्माता हर्षमोहन कृष्णात्रेय आहे. समीर रमेश सुर्वे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

'धुरंधर २' चे वादळ पाकिस्तानात घोंघावले: Netflix लाही केले क्रॅश, बनला क्रमांक १ चित्रपट

Fun Time 'पेपर-लीक' डॉक्टरने पेशेंटला दिली दोन इंजेक्शन

जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली

Shani Dev Jayanti महाराष्ट्रातील जागृत आणि प्रसिद्ध न्यायदेवता शनी मंदिरे

रजनीकांतच्या 'जेलर २' च्या सेटवर भीषण अपघात; विजेचा धक्का लागून क्रू मेंबरचा मृत्यू

पुढील लेख
Show comments