Marathi Biodata Maker

प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या 'प्रेमवारी'चा मुहूर्त संपन्न

Webdunia
शुक्रवार, 22 जून 2018 (10:11 IST)
'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं', प्रेमाची हि कधीच न बदलणारी संकल्पना एका नव्या रुपात मोठ्या पडद्यावर सादर होत आहे. सैमामित प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित 'प्रेमवारी' या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे, या आगामी सिनेमाबाबत आणखीन काही माहिती हाती आली नसली तरी, या सिनेमाला मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज याने संगीत दिले असल्याचे समजते. या सिनेमाच्या चित्रीकरणाला सध्या सुरुवात झाली असून, अहमदनगर येथील कोपरगाव तालुक्यातील वारी गावात या सिनेमाचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात आला. या शुभारंभ कार्यक्रमात कोपरगावचे शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, अहमदनगरचे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, संजीवनी कोलेज ऑफ इंजिनीरचे डिरेक्टर सुनील दादा कोल्हे, शिर्डी नगराध्यक्ष अभय भैय्या शेळके आणि शिर्डी संस्थान सदस्य सचिंत तांबे आदी. मान्यवर उपस्थित होते.
 
एक सुंदर प्रेमकथा घेऊन येणाऱ्या या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, निर्माते आणि प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे. या सिनेमातील प्रमुख कलाकारांबाबत तूर्तास मौन बाळगण्यात आले आहे. 'प्रेमवारी' हा चित्रपट प्रेमाच्या गुलाबी दुनियेची सफर घडवून आणण्यास लवकरच येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात एक मोठा खुलासा: कट कुठे रचला गेला होता? पोलिसांनी तपशील शेअर केला

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या भावाचं निधन

संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आईचे नाव का जोडले?

सुबेदार'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, अनिल कपूर वयाच्या 69 व्या वर्षीही अॅक्शन करताना दिसले

सर्वोच्च न्यायालयाने सापाच्या विषाप्रकरणी एल्विश यादवला फटकारले

सर्व पहा

नवीन

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या लग्नासाठी खास भेट म्हणून "राणाबली" मधील "ओ मेरे साजन" हे गाणे प्रदर्शित

पार्श्वगायनातून निवृत्त झाल्यानंतर अरिजीत सिंगचे मोठे आश्चर्य, पहिले स्वतंत्र गाणे "रायना" रिलीज

बाफ्टा पुरस्कार जिंकल्यानंतर 'बूंग' पुन्हा प्रदर्शित होणार, या तारखेला थिएटरमध्ये दाखल होणार

सुपरस्टार विजय थलापतीचा घटस्फोट होणार

गायक शानच्या अनोख्या शैलीने, सुफी गायकांसह, 'दमादम मस्त कलंदर'ला एक नवीन वळण दिले

पुढील लेख
Show comments