Festival Posters

’विशू’चेअव्यक्त मन व्यक्त करणार ‘रे मना’ See Video

Webdunia
बुधवार, 30 मार्च 2022 (19:40 IST)
दोन विभिन्न स्वभावाच्या व्यक्तींची हळुवार खुलत जाणारी प्रेमकहाणी आपल्याला 'विशू' मध्ये पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता 'विशू' चित्रपटातील 'रे मना' हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले असून या गाण्याला नेहा राजपाल हीच सुमधुर आवाज लाभला आहे. तर  ह्रषिकेश कामेरकर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.
'रे मना' हे गश्मीर महाजनी आणि मृण्मयी गोडबोले यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात गश्मीर आणि मृण्मयी यांच्यातील अव्यक्त प्रेम नजरेने व्यक्त करत आहेत. या गाण्याचे बोल अतिशय सुंदर असून प्रेमाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देणारे हे गाणे आहे.
 

या गाण्याबद्दल चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणतात, 'नकळत झालेल्या प्रेमाची जाणीव करून देणारे हे गाणे आहे. या गाण्यात गश्मीर आणि मृण्मयी प्रेमाची न बोलता कबुली देत आहेत. या गाण्यामुळे प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढेल. शहरी जीवनशैलीत वाढलेली आरवी जेव्हा गावातील लग्नातही तितकीच समरस होऊन जाते. इतकी मालवणची तिच्यावर जादू झाली आहे. कोकणातील लग्नघर कसे असते, याचेही या गाण्याच्या निमित्ताने दर्शन घडतेय.''
 
श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटात गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोलेसोबत ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 'विशू' हा चित्रपट ८ एप्रिलपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार

'तुंबाड २' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री; 'हस्तर'च्या रहस्यमय जगात साकारणार महत्त्वाची भूमिका!

या चित्रपटांमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकत्र दिसणार

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानिमित्त भारताच्या २३ शहरांमध्ये मिठाई वाटण्यात आली

राजपाल यादवने सुरु केला नवीन यूट्यूब चैनल

सर्व पहा

नवीन

ग्रीनलँडमधील टॉप १० पर्यटन स्थळे; सुंदर निसर्ग, बर्फ आणि साहसाचे एक अनोखे जग

या हिरोमुळे करण जोहर होळी साजरी करत नाही

मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारांची पंतप्रधानांसह मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेकडे मदतीची हाक

सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार

पैसे कमवण्यासाठी कॉफी शॉपमध्ये काम करणाऱ्या श्रद्धा कपूरने १६ व्या वर्षी सलमान खानची चित्रपट ऑफर नाकारली

पुढील लेख
Show comments