Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'ती आणि इतर' साठी सचिन पिळगावकर बनले गजलकार 'शफक'

Webdunia
बुधवार, 12 जुलै 2017 (11:01 IST)
मराठी चित्रपटसृष्टीतले अष्टपैलु व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ कलाकार सचिन पिळगावकर प्रथमच 'कवी' च्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे! अभिनेता, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक, गायक आणि निर्माता अशा चित्रपटसृष्टीच्या विविध कक्षा पडताळून पाहणारे सचिनजी आता 'ती आणि इतर' या आगामी सिनेमाचे गजलकार म्हणून लोकांसमोर येत आहे.

हिंदी दिग्दर्शक गोविंद निहालाणी दिग्दर्शित या सिनेमासाठी 'शफक' या टोपण नावाने त्यांनी गजल लिहिली आहे. 'बादल जो घीर के आये' असे या गजलचे उर्दू बोल असून,  संगीतकार वसुदा शर्मा दिग्दर्शित हि गजल अदिती पौल यांनी गायले आहे. सिनेमातील ह्या गझलमुळे सचिन यांना 'गझल कवी 'शफक' अशी देखील ओळख लवकरच मिळणार आहे. तसेच या सिनेमात मंदार चोळकर लिखित आणि वसुदा शर्मा संगीतदिग्दर्शित 'आतुर मन' हे गाणेदेखील यात असणार आहे. गायिका अंकिता जोशीचा आवाज लाभलेले हे गाणे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे ठरणार आहे. 
सायलेन्स इस नॉट अन ऑप्शन...' (गप्पं बसणं हा काही पर्याय नाही होऊ शकत) या मथळ्याला अधोरेखित करणारा 'ती आणि इतर' हा सिनेमा २१ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. स्त्री समस्येवर भाष्य करणाऱ्या ह्या चित्रपटात सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आहे. हिमांशू ठाकूर प्रस्तुत या चित्रपटाची प्रकाश तिवारी, पुनीत सिंह, दयाल निहालाणी आणि धनंजय सिंह या तिकडींनी निर्मिती केली असून, मंजुळा पद्मनाभन यांच्या इंग्रजी नाटक 'लाईटस् आऊट' वर हा सिनेमा आधारित आहे. तसेच प्रसिद्ध स्त्रीवादी विचारधारेतील लेखिका शांता गोखले यांनी या सिनेमाची पटकथा आणि संवाद लिहिली आहे. या सिनेमात अमृता सुभाष, अविष्कार दारव्हेकर, भूषण प्रधान, प्रिया मराठे सुमन पटेल आणि गणेश यादव  हे कलाकार देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत.  
सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

रणवीर इलाहाबादियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; यूट्यूब चॅनेल्सवर पसरणाऱ्या अश्लीलतेबद्दल सरकार काय करत आहे?

प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर

नीमराणा किल्ला पॅलेस अलवर राजस्थान

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

एकता कपूरच्या वकिलाने बजावली नोटीस, 100 कोटींच्या मानहानीची चर्चा

पुढील लेख
Show comments