रसिका प्रॉडक्शन्सच्या अनामिका संस्थेच्या कोड मंत्र या नाटकास रु. 4 लाख 50 हजाराचे द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. तसेच सुबक, मुंबई या संस्थेच्या अमर फोटो स्टुडिओ या नाटकास रु. 3 लाखांचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. या पुरस्कारांनी दिग्दर्शकांनाही सन्मानित करण्यात आलं आहे. मग्न तळ्याकाठी या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी चंद्रकांत कुलकर्णी यांना (रु.1,50,000/-) प्रथम पारितोषिक देण्यात आलं आहे. तर कोडमंत्र या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी राजेश जोशी यांना (रु.1,00,000/-) द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. तर अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनाही (रु.50,000/-) रोख पुरस्कार प्राप्त झाला आहे. मनस्विनी लता रविंद्र यांनी लेखन केलेल्या अमर फोटो स्टुडिओ या नाटकाला (रु.1,00,000/-) प्रथम पारितोषिक मिळालं आहे. तर मग्न तळ्यासाठी या नाटकाच्या लेखनासाठी महेश एलकुंचवार यांना (रु.60,000/-) द्वितीय पारितोषिक मिळालं आहे. तसेच विजय निकम लिखित कोडमंत्र या नाटकाला (रु.40,000/-) तृतीय पारितोषिक मिळालं आहे. 2 ते 6 मे 2017 या कालावधीत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण 10 व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आशालता वाबगांवकर, श्रीनिवास भणगे, चंद्रकांत मेहेंदळे, अजित सातभाई आणि सुनील देवळेकर यांनी काम पाहिले.