rashifal-2026

प्रेमात पाडणारा 'इशारा'

Webdunia
गुरूवार, 12 जानेवारी 2017 (12:10 IST)
मराठीतल्या पहिल्या सिंगल सॉंगचे परदेशात चित्रीकरण 
 
मराठी सिनेसृष्टीत होणारे असंख्य बदल आपण पाहत आहोत. असाच एक नवीन बदल आपलयाला एका मराठी सिंगल सॉंगमध्ये पाहायला मिळणार आहे. बॉलिवुडमध्ये आपल्याला अनेक सिंगल सॉंग पाहायला मिळाले आहेत. या सिंगल सॉंगची क्रेझ आजच्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. ही क्रेझ लक्षात घेता  निखिल रानडे हा गायक रोमॅंटिक सिंगल सॉंग प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या निखिल रानडे यांनी  'यार' तसेच सावनी रवींद्र यांच्या 'झोका तुझा' या म्युझिक अल्बमची निर्मिती केली आहे. पार्श्वगायनाचा छंद जोपासणाऱ्या निखिल यांचा 'इशारा तुझा' हा मराठी  म्युझिक सिंगल प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. 'इशारा तुझा' या सिंगल सॉंगची खासियत म्हणजे हा संपूर्ण अल्बम लंडन येथे चित्रित करण्यात आला आहे. परदेशात चित्रित करण्यात आलेला हा पहिलाच मराठी म्युझिक सिंगल आहे. या सिंगल सॉंगमध्ये आपल्याला निखिल रानडे आणि  प्रियांका ठाकरे- पाटील असे नवीन चेहरे दिसणार आहेत.  ऋषिकेश नेरे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला रश्मीम महागावकर यांनी संगीत दिले असून खुद्द निखिल रानडे यांनी गायलं आहे. राजीव रानडे यांनी आपल्या दिग्दर्शकीय नजरेतून हे गाणं साकारलं आहे. राजीव रानडे हे निखिल रानडे यांचे वडील बंधू असून या गाण्याची सिनेमॅटोग्राफी राजीव यांनी केली आहे. प्रेमात पडल्यानंतरच्या पहिल्या भावनेवर आधारित असलेल्या या सिंगल सॉंगमध्ये पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचा या जोडीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे. निखिल रानडे या गाण्याविषयी खूप उत्सुक असून प्रेक्षक 'यार' इतकंच या गाण्यावरसुद्धा प्रेम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपल्या निर्मितीसंस्थेअंतर्गत अजून काही चांगल्या कलाकृती सादर करण्याचा त्यांचा मानस असून या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे हा मुख्य उद्देश निखिल रानडे यांचा आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांचे कौतुक करत; या पिढीतील त्यांचे आवडते अभिनेते सांगितले

दीपिका पदुकोणची शक्तिशाली लाइनअप: 'किंग' आणि अ‍ॅटलीचा चित्रपट 2026 मध्ये धमाल उडवण्यास सज्ज

यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला

मर्दानी 3 ची खलनायक अम्मा यांनी खळबळ उडवून दिली, प्रेक्षक थक्क झाले

बॉर्डर 2 : 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री फडणवीसांनी रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांचे कौतुक करत; या पिढीतील त्यांचे आवडते अभिनेते सांगितले

वडील कर्जबाजारी झाले आहेत...वोटिंग करायला पोहचल्या अक्षय कुमारकडून मुलीने मागितली आर्थिक मदत

नायक म्हणून मर्यादित यशानंतर, नील नितीन मुकेशने खलनायक भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध केले

प्राचीन वास्तुकलेसह एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ हंपी, कर्नाटक

पोंगल २०२६: पांढऱ्या साड्या बॉलीवूड अभिनेत्रींनी स्वतःच्या अनोख्या शैलीत पारंपारिक सुंदरपणे नेसली

पुढील लेख
Show comments