Marathi Biodata Maker

'गं सहाजणी' च्या बँकेत मानसी नाईकची एन्ट्री

Webdunia
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 (12:26 IST)
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ग सहाजणी' ही विनोदी मालिका प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेतील पात्र आणिघडणाऱ्या घटना वास्तवाशी मिळत्याजुळत्या असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. जीवनातील मर्म अगदी चपखल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न यामालिकेतून केला जात आहे. दैनंदिन घटनांचा त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे  हसतखेळत  समाधान करणारी ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रातआवडीने पहिली जात आहे.सध्या सुरु असलेल्या चलनबदलाचा विषय या मालिकेत दाखवण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादमिळाला होता. बँकेतील कर्मचाऱ्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या मालिकेचा पुढचा भाग खूप रंजक असणार आहे.
 
या मालिकेच्या सोमवार ५ डिसेंबरच्या  विशेष भागात अभिनेत्री मानसी नाईक या बँकेत पाहुणी कलाकार म्हणून दाखल होणार आहे. तिने यासहाजणींसोबत बँकेत केलेली धमाल हा या भागातला आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. १००० आणि ५०० रु. च्या चलनबदलांमुळे कामाचा अतिरिक्तताण पडलेल्या सहाजणींना मानसीच्या येण्यामुळे थोडी उसंत मिळणार असल्यामुळे मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत सध्या उत्साहाचे वातावरणआहे.
 
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या ठेक्यावर नाचवणारी मानसी नाईक सहाजणीच्या या ताफ्यात काय धम्माल करते, हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

2026 मध्ये ‘मर्दानी 3’पासून राणी मुखर्जी साजरे करणार आपल्या शानदार कारकिर्दीची 30 वर्षे

इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग यांचे निधन

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले

ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला

धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री फडणवीसांनी रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांचे कौतुक करत; या पिढीतील त्यांचे आवडते अभिनेते सांगितले

वडील कर्जबाजारी झाले आहेत...वोटिंग करायला पोहचल्या अक्षय कुमारकडून मुलीने मागितली आर्थिक मदत

नायक म्हणून मर्यादित यशानंतर, नील नितीन मुकेशने खलनायक भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध केले

प्राचीन वास्तुकलेसह एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ हंपी, कर्नाटक

पोंगल २०२६: पांढऱ्या साड्या बॉलीवूड अभिनेत्रींनी स्वतःच्या अनोख्या शैलीत पारंपारिक सुंदरपणे नेसली

पुढील लेख
Show comments