Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

NAAL BHAG 2 : 'नाळ भाग 2'सोबत जोडली गेली कलाकारांची नाळ

Webdunia
गुरूवार, 16 नोव्हेंबर 2023 (18:38 IST)
NAAL BHAG 2
सध्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ भाग 2'ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता मराठी कलाकारांचीही या चित्रपटासोबत नाळ जोडली जात आहे. अनेक कलाकार आपल्या सोशल मीडियावरून या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. महेश मांजरेकर, विजू माने, आदिनाथ कोठारे, स्मिता तांबे यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. महेश मांजरेकर यांनी आपल्या सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर केला आहे. ''अप्रतिम सिनेमा आहनाळ . अभिमान वाटला, की मराठीत असा चित्रपट यावा. 'नाळ भाग २' हा सिनेमा देशात सगळ्यांनी बघायला पाहिजे. यात तीन मुलांची कामे आहेत. अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये या चित्रपटाला नामांकने मिळतील. विशेषतः या चित्रपटातील चिमीची भूमिका साकारणाऱ्या त्या चिमुकलीला. मी सांगेन तिचे नामांकन सर्वोत्कृष्ट बालकलाकारमध्ये न घेता 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'मध्ये घ्या. मराठी चित्रपट काहीतरी वेगळे देण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. अतिशय सुंदर चित्रपट आहे. सर्वानी हा चित्रपट नक्की पाहा.'' असे कौतुक करत हा चित्रपट पाहाण्याचे आवाहनही महेश मांजरेकर यांनी केले आहे. तर दिग्दर्शक विजू माने म्हणतात, ''सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी लेखणीसहित कॅमेऱ्यानेही चित्रपट सुंदर रेखाटला आहे. पात्रांच्या रचना आणि त्यांच्या एकमेकांशी असलेला प्रतिकात्मक संबंध हा अगदी सामान्य प्रेक्षकांनाही कळणारा आहे. कुठलाही अविर्भाव नसलेला हा अत्यंत नैसर्गिक आणि निरागस सिनेमा निखळ आनंद देऊन जातो.'' ''प्रत्येक फ्रेम *काहीतरी सांगतेय. शब्दांपेक्षा दृष्टिक्षेपातून दाखवण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. बघता बघता आपसूकच कंठ दाटून येतो. अप्रतिम सिनेमा.''अशी प्रतिक्रिया आदिनाथ कोठारे याने दिली आहे. तर स्मिता तांबे म्हणते, '' एक अत्यंत अप्रतिम अनुभव आहे. भावाबहिणीने, संपूर्ण कुटुंबाने एकत्र जाऊन पाहावा, असा हा सिनेमा आहे. या चित्रपटात अनेक हळव्या भावना आहेत. एखाद्या गावाचे चुकून कॅमेरा शिरला आहे, इतका नैसर्गिक अभिनय ही पत्रे करत आहेत. सुधाकर रेड्डी यंकट्टी, नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजने एक उत्तम कलाकृती दिवाळीच्या निमित्ताने भेट दिली आहे.'' याव्यतिरिक्त प्रियदर्शन जाधव, सोनाली खरे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, प्रथमेश परब आदी कलाकारांनीही 'नाळ भाग २'चे विशेष कौतुक केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Look Back Entertainment 2024: गुगलवर जगभरात सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रिटी बनली हिना खान

सलमान खान साऊथमध्ये खळबळ उडवणार,या सुपरस्टारच्या चित्रपटात दिसणार

हैदराबाद येथील घरातून अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी केली अटक

रणबीर कपूरने 'ब्रह्मास्त्र' आणि 'ॲनिमल'च्या सिक्वेलचे अपडेट दिले

लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर...; कथानक ऐकताच मालिकेसाठी होकार दिला

सर्व पहा

नवीन

यशराज फिल्म्स आणि पोशम पा पिक्चर्सच्या पहिल्या मोठ्या चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत, समीर सक्सेना करणार दिग्दर्शन!

अल्लू अर्जुनने 'पीडित मुला'साठी शेअर केली भावनिक नोट, व्यक्त केली चिंता

Christmas 2024: गोव्यातील या ठिकाणी ख्रिसमस साजरा करा

एक मुलगी खुप घाई घाईने कुठेतरी चाललेली असते

मित्राच्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो

पुढील लेख
Show comments