Dharma Sangrah

'नशीबवानचा' कृतज्ञता सोहळा

Webdunia
बुधवार, 16 जानेवारी 2019 (12:03 IST)
'लॅन्डमार्क फिल्म्सतर्फे' सफाई कर्मचारी आणि त्यांच्या परिवारासाठी 'नशीबवान' या चित्रपटाचा एक 'स्पेशल शो' माहीम येथील सिटीलाईट येथे आयोजित करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या 'या' शो साठी भाऊ कदम, लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल, चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल वसंत गोळे आणि निर्माते आदी उपस्थित  होते. भाऊ कदम यांनी यावेळी सफाई कामगारांसोबत 'नशीबवान' हा चित्रपट पहिला. 'नशीबवान' हा चित्रपट
सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बबन या सफाई कामगारांचे आयुष्य एका घटनेमुळे कसे अचानक बदलते आणि तो बदल हा बबन कसा हाताळतो ह्या प्रश्नांची उत्तरे म्हणजे 'नशीबवान' हा चित्रपट. ह्या चित्रपटाला मिळणाऱ्या यशाचे गुपित म्हणजे सिनेमातील वास्तविकता. कारण ह्या सिनेमातील प्रत्येक दृश्य हे वास्तविक आहे. त्यामुळे प्रेक्षक चित्रपट बघताना स्वतःला त्या सिनेमासोबत जोडले गेले. ह्या चित्रपटाची शूटिंग करताना सफाई कामगारांचे आयुष्य सिनेमाच्या टीमला खूप जवळून बघता आले. त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न टीमने पाहिले. शिवाय चित्रीकरण करताना ह्या सर्व लोकांनी जी मदत कलाकारांना आणि टीमला केली त्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या चित्रपटाचा एक विशेष शो या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. ह्या शोचा त्यांनी खूप आनंद लुटला. त्यांचा आनंद, त्यांचे प्रेम पाहून संपूर्ण चित्रपटाची टीम पण खूप भावुक झाली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

Year Ender 2025: 2025 मध्ये हे सेलिब्रिटी पालक झाले

क्यूंकी सास भी कभी बहू थी 2: तुळशी मिहिरपासून वेगळी झाली, नवीन जीवन सुरू केले

धुरंधर'मधील 'शरारत' गाण्यासाठी तमन्ना भाटियाची पहिली पसंती होती, आदित्य धरने तिला का नाकारले?

नोरा फतेहीच्या कारला अपघात, मद्यधुंद चालकाने वाहनाला धडक दिली

धुरंधर' 500 कोटी क्लबमध्ये सामील, 16व्या दिवशी शाहरुख खानचा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments