suvichar

निशिकांत कामत साकारणार ‘फुगे’ चा खलनायक

Webdunia
बुधवार, 25 जानेवारी 2017 (14:49 IST)
बॉलीवूड एक्टर आणि डिरेक्टर म्हणून ओळखले जाणारे निशिकांत कामत लवकरच आगामी ‘फुगे’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. यापूर्वी मराठीत ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’ सारख्या सिनेमाचे दिग्दर्शन केल्यानंतर ते प्रथमच ‘फुगे’ या सिनेमाच्या माध्यमातून पडद्यावर झळकणार आहेत. येत्या १० फेब्रुवारीला प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात ते ‘भैरप्पा’ नामक खलनायकाच्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर येतील. खलनायक म्हंटला तर तो वाईट, क्रूर असा असतो, मात्र या सिनेमातील निशिकांत यांनी साकारलेला खलनायक अगदी निराळा असून, तो प्रेक्षकांना लोटपोट हसवणारा आहे. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात निशिकांत कामत यांनी साकारलेला हा खलनायक सिनेरसिकांसाठी सरप्राईज पॅकेज ठरणार आहे. 

स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित ‘फुगे’ सिनेमात निशिकांत कामत गोव्यातील एका गाव गुंड्याची व्यक्तिरेखा साकारत असून, हा गुंड जितका रागीट आहे तितकाच प्रेमळ देखील आहे.  या सिनेमातील त्याचे डायलॉग्सदेखील प्रेक्षकांना नादखुळा करणारे ठरणार आहे. 'एकच फाईट आणि वातावरण टाईट...'अशा धाटणीचे अनेक डायलॉग्स या भैरप्पाचे असल्यामुळे निशिकांत कामतचे हे आगळेवेगळे रूप रसिकांना नक्कीच आवडेल. शिवाय या हटके रोलमधून निशिकांत पहिल्यांदाच विनोदी भूमिकेतून झळकणार असल्याकारणामुळे, त्याच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा खुप खास असणार आहे. 

इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात स्वप्नील-सुबोध जोडीबरोबरच प्रार्थना बेहेरे, नीता शेट्टी, आनंद इंगळे, मोहन जोशी आणि सुहास जोशी यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. 
सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

'धुरंधर'च्या यशानंतर, सारा अर्जुन बाबा महाकाल यांच्या दर्शनासाठी गेली

रणवीर सिंग नागपूर येथील आरएसएस मुख्यालयात पोहोचला, मोहन भागवत यांच्यासोबत एक विशेष बैठक

'धुरंधर: द रिव्हेंज' भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा चित्रपट ठरला, रणवीर सिंग ₹१००० कोटींच्या हिंदी नेट क्लबमध्ये पोहोचणारा पहिला अभिनेता

Gangotri Wildlife Sanctuary उत्तराखंडमधील प्रसिद्ध आणि भव्य पर्यटन स्थळ; गंगोत्री राष्ट्रीय उद्यान

'राजा शिवाजी'चे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले, चित्रपटाचे 'छत्रपती' हे गीत या दिवशी प्रदर्शित होणार

पुढील लेख
Show comments