Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाजीप्रभू देशपांडे शौर्यगाथा दर्शविणारा चित्रपट 'पावनखिंड'चा ट्रेलर रिलीज

Webdunia
गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (20:33 IST)
हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारे बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट पावनखिंड हा अंगावर शहारा आणणारा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर असून त्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजीराजेंच्या इतिहासावर आधारित असून आपल्या लाडक्या महाराजा छत्रपतींच्या सैन्यात 300 मावळांसह सिद्धी जौहरला खिंडीत रोखून धरणारे तसेच युद्धात आपल्या प्राणाचे बलिदान करणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्या चित्तथरारक पराक्रमावर आधारित असलेला हा चित्रपट अक्षरश : अंगावर शहारे आणणारा आहे. या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, दिप्ती के, अभिनेता चिन्मय मांडलेकर हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. 
 
चित्रपटाचा ट्रेलर म्हणजेच चित्रपटाची छोटीशी झलक असते. या ट्रेलवरूनच चित्रपटात काय असणार आहे किंवा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे याची एक साधारण कल्पना आपल्याला मिळते. परंतु पावनखिंडचा ट्रेलरच इतका भव्य आहे कि यावरूनच आपण अंदाज लावू शकतो कि दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आणि त्याच्या टीमने आपल्यासाठी किती भव्य कलाकृती या चित्रपटाच्या माध्यमातून बनवली आहे. याशिवाय सिनेमाची सिनेमॅटोग्राफी देखील या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणार हे ट्रेलरमधून जाणवतेच आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

कांटा लगा या गाण्यासाठी शेफाली जरीवालाला इतके पैसे मिळाले

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

Travel :हिवाळ्याच्या हंगामात भारतात या ठिकाणी भेट द्या

पुढील लेख
Show comments