Dharma Sangrah

सध्या मी बॉलीवूड सिनेमे पाहात नाही! – नीना गुप्ता

Webdunia
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017 (17:23 IST)
“मी आजवर एकही मराठी सिनेमा पाहिलेला नाही. त्यामुळे चरणदास चोर हा मी पाहिलेला पहिला सिनेमा ठरेल. हिंदीच्या तुलनेत मराठी भाषेतील साहित्य उत्तम आहे. मराठीत खुप चांगले विषय हाताळले जातात. त्यामुळे मराठी सिनेमा हा जास्त आशयघन आहे. बॉलीवूड सिनेमांमुळे मराठी चित्रपटांना खूप संघर्ष करावा लागतो. पण, मला आशा आहे की लवकरच यावर तोडगा निघेल आणि मराठी सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. मी सध्या बॉलीवूड सिनेमे पाहाणं बंद केलंय. कारण, ते पाहताना मला सतत वाटत राहतं की, त्यातील एखादी व्यक्तिरेखा मी साकारली असती तर उत्तम झालं असतं. पण, तसं घडत नाही, याचं मला दु:ख होतं. आता तर माझा शिष्य श्याम महेश्वरी मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक बनलाय, तर मला मराठी भाषा शिकावी लागेल. कारण, आता मला मराठी चित्रपटात काम मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.” आपल्या खुमासदार शैलीत सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपले मनोगत व्यक्त केले. युनीट प्रोडक्शन निर्मित चरणदास चोर या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळ्यासाठी तसेच आपल्या शिष्याला शुभेच्छा देण्यासाठी नीना गुप्ता उपस्थित होत्या. त्यांच्या शुभहस्ते चित्रपटाचा ट्रेलर व संगीत प्रकाशन करण्यात आले
 
या सोहळ्याप्रसंगी निर्मात्या दीपा महेश्वरी, क्रिएटीव्ह दिग्दर्शक संजू होलमुखे, संगीतकार रोहित मांजरेकर, चित्रपटात चरणदास चोर या मुख्य भूमिकेतील कलाकार सोलापूर-बार्शीचा नाट्यअभिनेता अभय चव्हाण, सोनम पवार, बालकलाकार आदेश आवारे, सिनेमॅटोग्राफर सुमीत सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
संत कबीर आणि गीतकार मंदार चोळकर यांच्या रचनांना सोनी मिक्स वाहिनीच्या माध्यमातून चर्चेत आलेल्या इंडीयन म्युझिक लॅब च्या रोहित मांजरेकर यांनी संगीतबद्ध केले आहे. सुप्रसिद्ध गायक तसेच संत कबीरांचे दोहे गाणारे, अशी भारतभरात ओळख असलेले मध्य प्रदेशातील महान गायक पद्मश्री प्रल्हाद टिप्पणिया यांनी ‘होशियार रहना के नगर में चोर आवेगा’ हे चित्रपटाच्या कथेला साजेसे असलेले गीत गायले आहे. त्याचबरोबर आतीफ अफजल, प्रीती देशमानकर, गीतसागर, गौरव बांगिया, पावनी पांडे, अली अस्लम यांनी इतर गाण्यांना स्वरसाज चढवला आहे.
 
रोमान्स, ॲक्शन, भव्य सेट्स, ग्राफीक्सचा प्रभावी वापर, भलीमोठी स्टारकास्ट आणि बीग बजेट असे समीकरण असलेल्या जमान्यात उत्तम कथानक आणि परिस्थितीजन्य, तार्किक-मार्मिक विनोदी असलेला चरणदास चोर हा सिनेमा येत्या 22 डिसेंबरला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

सर्व पहा

नवीन

संजय दत्तच्या 'आखरी सवाल'चा ट्रेलर एका भव्य कार्यक्रमात प्रदर्शित होणार; निर्मात्यांची घोषणा

भारतातील ही ५ सुंदर ठिकाणे; कमी खर्चात गर्दीपासून दूर सहलीचे नियोजन करण्याची एक उत्तम संधी

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

प्रसिद्ध गायकाचे कार अपघातात निधन

मधू मंटेना आणि इरा त्रिवेदी यांना पुत्ररत्न प्राप्त झाले असून, नामकरण सोहळा वैदिक रिती रिवाजानुसार पार पडला

पुढील लेख
Show comments