Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रिया बापट आणि उमेश कामत पुन्हा एकत्र येणार

Webdunia
सोमवार, 17 जुलै 2023 (14:32 IST)
Photo- Instagram
प्रिया बापट आणि उमेश कामत ही लोकप्रिय जोडी आहे. त्यांचे 2010 मध्ये प्रदर्शित झालेले व्यावसायिक नाटक 'नवा गडी नवा राज्य'ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता तब्बल 9 वर्षानंतर ही जोडी एका नव्या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

एका इंस्टाग्रामच्या लाईव्ह सेशनच्या माध्यमाने त्यांनी ही  बातमी दिली. ही जोडी इरावती कर्णिक यांनी लिहिलेल्या 'जर तरची गोष्ट या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा एकत्र येणार आहेत. नाटकाच्या शुभारंभाचे  प्रयोग मुंबई आणि पुण्यात होणार आहे. या नाटकाची तालीम सुरु झाली असून येत्या 5 ऑगस्टला गडकरी रंगायतन येथे प्रयोग होईल. तर दुसरा प्रयोग 12 ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे. 

उमेशने इंस्टावर या नाटकाचा प्रोमो शेअर करत "प्रियाबरोबर मी खूप वर्षांनी रंगभूमीवर एकत्र काम करणार आहे. जर आपण पुन्हा एकत्र काम केलं तर? या जर आणि तर चा प्रवास 'जर तर च्या गोष्टीं पर्यंत पोहोचला आहे. जर आणि तर मध्ये अडकलेल्या नात्याची हसण्याची आणि रुसण्याची ही आजची गोष्ट तु्म्हाला नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे.

‘जर तरची गोष्ट’
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)


या नाटकात प्रिया बापट , उमेश कामत , पल्लवी अजय, आशुतोष गोखले हे प्रमख भूमिकेत दिसणार. इरावती कर्णिक यांनी नाटकाचे लेखन केले आहे. तर अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी दिग्दर्शन केलं आहे.  
 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

जाट'ची रिलीज डेट फायनल, सनी देओल या दिवशी अक्षय कुमारशी भिडणार

प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदे आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे

तब्बूने 'भूत बंगला ' संदर्भात एक मोठे अपडेट दिले

आयुष्मान खुराना बनले FICCI फ्रेम्सचा ब्रँड ॲम्बेसेडर

अभिषेक बच्चनच्या 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडिओवर झाला

सर्व पहा

नवीन

पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मुलीने व्यक्त केली कृतज्ञता, सरकारचे आभार मानले

जाट'ची रिलीज डेट फायनल, सनी देओल या दिवशी अक्षय कुमारशी भिडणार

प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदे आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे

अंबरनाथ शिवमंदिर

तब्बूने 'भूत बंगला ' संदर्भात एक मोठे अपडेट दिले

पुढील लेख
Show comments