Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रजित कपूर साकारणार औरंगजेब

Webdunia
रविवार, 28 जानेवारी 2024 (17:32 IST)
‘ब्योमकेश बक्षी' या मालिकेमुळे घराघरात पोहचलेले अभिनेते रजित कपूर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित 'छत्रपती संभाजी' या मराठी चित्रपटात ते क्रूरकर्मा औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी आपल्या भेटीला येणार आहे.परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत 'छत्रपती संभाजी' हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे. 
 
औरंगजेब क्रूर शासक होता, सोबत तो धोरणी आणि  कपटी  होता. त्यामुळे औरंगजेबसाठी कसलेला कलाकार हवा होता, रजित कपूर या भूमिकेला न्याय देऊ  शकतील  यामुळे  त्यांना  ही संधी  दिल्याचं दिग्दर्शक राकेश सुबेसिंह दुलगज सांगतात. 
 
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना रजित कपूर ते सांगतात की, मी आतापर्यंत खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्या. ‘छत्रपती संभाजी’ च्या निमित्ताने मला प्रथमच नकारात्मक ऐतिहासिक भूमिका करण्याची संधी मिळाली.  या चित्रपटाचा मी महत्त्वपूर्ण भाग आहे याचा मला आनंद आहे.  
 
रजित कपूर यांच्यासह प्रमोद पवार, शशांक उदापूरकर,दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ  धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख , कै. आनंद अभ्यंकर,समीर, मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार  'छत्रपती संभाजी'  चित्रपटात आहेत. 
 
'छत्रपती संभाजी' चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा  सुरेश चिखले यांची आहे. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी  दिले आहे.  छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. कला अनिल वठ यांची आहे. साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments