आजच्या २१ व्या युगात मुले कार्टून नेटवर्क आणि मोबाईलकडे वळली असताना आजही अनेक संस्था मुलांना ऐतिहासिक ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी कार्यरत आहेत. कल्पांगण संस्था ही त्यांच्यापैकी एक आहे. नुकतचं हनुमान जयंती निमित्त कल्पांगण संस्थेने "रामरंग" हा कार्यक्रम राबवला. भगवान राम यांच्या आयुष्यावर आधारित असलेली कथा या नृत्यनाटिकेत मांडण्यात आली. रामरंग फक्त कलाकृती नसून कल्पांगणच्या कलाकारांसाठी एक परंपरा आहे,असं कल्पांगणच्या संचालिका कल्पिता राणे सांगतात.
कल्पांगणच्या रामरंग कार्यक्रमाचे वैशिष्ट्यं म्हणजे या कलाकृतीत जवळपास सत्तर कलाकार रंगमंचावर एक-एक करुन आपली कलाकृती सादर करत असतात. शनिवारी दामोदर नाट्यगृह येथे पार पडलेला कल्पांगणचा २५ चा रौप्य महोत्सव सोहळा पार पडला. कल्पांगणच्या यंदाच्या कार्यक्रमाला नाना आम्बोले -नगरसेवक परेल विभाग, प्रदीप राणे -ज्येष्ठ लेखक व दिग्दर्शक, मंजुल भारद्वाज- थियेटर ऑफ रेलवेंस याचे रचयिता आणि नाटकार, मुकेश जाधव-सिने नाट्य प्रशिक्षक व दिग्दर्शक, ऋत्विक केंद्रे -युवा अभिनेता, योगिनी चौक-युवा अभिनेत्री, सदानंद राणे-ज्येष्ठ लोककला अभ्यासक, अभय पैर-कवी नाटककार अशी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.