Dharma Sangrah

'मुळशी पॅटर्न'नंतर आता 'रेती पॅटर्न'

Webdunia
सोमवार, 17 डिसेंबर 2018 (13:22 IST)
सध्या राज्यभरात 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या या चित्रपटावर सुरुवातीला बरीच टिकाटिप्पणी झाली पण जेव्हा चित्रपटगृहांत तो प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. शेतकरी, गुन्हेगारी आणि पोलीस यांच्यावर आधारित सहकुटुंब पाहता येईल असा चित्रपट प्रवीण तरडेंनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. हा चित्रपट, त्याचे कथानक, संवाद यांसोबतच आणखीएका गोष्टीने लोकांची मनं जिंकली आहे ती म्हणजे प्रवीण तरडे यांची बेधडक वक्तव्यं आणि मतं. शेतकर्‍यांवर होणारा अन्याय, विकासांचे पर्याय शोधताना शेतकर्‍यांचा न केलेला विचार, तहसीलदारांवर होणारे हल्ले यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. भविष्यात आपल्या चित्रपटांतून सामाजिक मद्यांना अधोरेखित करणार असल्याचं सांगतानाच 'मुळशी पॅटर्न'नंतर आता  'रेती पॅटर्न' घेऊन येणार असं प्रवीण तरडे म्हणाले. देशाचा विकास करताना आपण शेतकर्‍यांचा विचारच करत नाही ही आपली खरी समस्या आहे. माझा चित्रपट हा शेतकर्‍यांना सजग करेल. शेती ही विकण्यासाठी नव्हे तर राखण्यासाठी असते असे संवाद यामध्ये आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री मौनी रॉयचा संसार मोडला

चित्रपट महोत्सव: १९ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (MIFF) प्रतिनिधी नोंदणी जोरात सुरू झाली असून महोत्सव १५ जूनपासून सुरू होईल

तारा सिंग आणि सकीना पडद्यावर परतणार, अमिशा पटेलने 'गदर ३' ला दुजोरा दिला!

June is the best month for family trips जून महिन्यात भारतातील ही थंड हवेची ठिकाणे कुटुंबासोबत फिरण्यासाठी सर्वोत्तम

'द नर्मदा स्टोरी' चित्रपटाचे अनोखे प्रमोशन, व्हायरल स्क्रीनशॉटने खळबळ उडवून दिली; चित्रपट याच दिवशी प्रदर्शित होणार

पुढील लेख
Show comments