Festival Posters

'वेलेन्टाइन डे' च्या मुहूर्तावर रुपाली भोसलेची 'व्हूज नेक्स्ट'?

Webdunia
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019 (14:38 IST)
प्रेमाचा गुलाबी रंग प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. खास करून व्हेलेंटाईन डेच्या दिवशी तर हा रंग खूपच बहरतो. मात्र या रंगाला बट्टा लावणाऱ्या अनेक घटना समाजात घडतात. प्रेमभंग आणि फसवणुकीमुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त होते, त्यामुळेच तर प्रेम करा पण जरा जपून, असंच काहीसं मराठी आणि हिंदी अभिनेत्री रुपाली भोसले आपल्या लघुपटाद्वारे सांगणार आहे. 'व्हूज नेक्स्ट' या लघुपटाद्वारे ती प्रेक्षकांसमोर येत आहे. व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत असलेला हा एक सस्पेन्स थ्रिलर असलेला हा लघुपट आहे. हा एक स्त्रीप्रधान लघुपट असून, रुपालीने यात 'मायरा नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या लघुपटाद्वारे आम्ही सामाजिक संदेश देण्याचा प्रयन्त केला असल्याचे ती सांगते. बलात्कार, ऍसिड हल्ला, छेडखानी यांसारख्या घटना वाढत आहे. अश्यावेळी पिढीत मुलीने काय करावं? वर्षानुवर्षे कायद्याच्या कचाट्यात अडकून न्यायाच्या प्रतीक्षेत बसावं, कि अजून काही ठोस पाऊलं उचलावी ? यावर हा लघुपट भाष्य करणार आहे. प्रेम आंधळे नव्हे तर डोळस करण्याची आवश्यकता असल्याचा संदेश या सिनेमाद्वारे रुपाली देते. अभिजित चौधरी लिखित आणि दिग्दर्शित 'व्हूज नेक्स्ट ?' हा लघुपट युट्यूब वर पाहता येणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

फराह खानने दीपिका पदुकोण, मलाईका पासून गीता कपूर पर्यंत सर्वांना स्टार बनवले

सलमान खानच्या गाडीत गणेशमूर्ती दिसली, चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली

Pawna Lake लोणावळ्याजवळील अतिशय सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ

फातिमा सना शेखने बिकिनी घालून तलावात उडी मारली, चाहत्यांसोबत तिचा अनुभव शेअर केला; व्हिडिओ व्हायरल

श्रीदत्त क्षेत्र आत्मतीर्थ पांचाळेश्वर

पुढील लेख
Show comments