Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोनाली कुलकर्णी म्हणतेय 'मी एकटी' 'शॉर्ट ॲण्ड स्वीट' मधील प्रेमगीत प्रदर्शित

Webdunia
गुरूवार, 12 ऑक्टोबर 2023 (19:37 IST)
शुभम प्रोडक्शन प्रस्तुत पायल गणेश कदम, विनोद राव निर्मित 'शॉर्ट ॲण्ड स्वीट' या चित्रपटातील 'मी एकटी' हे गोड गाणे प्रदर्शित झाले आहे. सोनाली कुलकर्णी आणि श्रीधर वत्सर यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे सुरेख गाणे आनंदी जोशीने गायले असून या रोमँटिक गाण्याचे बोल मंगेश कांगणे यांचे आहेत. या संतोष मुळेकर यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. या गाण्यात सोनाली कुलकर्णी श्रीधर वत्सर यांची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहे. त्यांच्यातील हे गोड नाते, निरागस प्रेम खूपच सुंदर आहे. गाण्याचे बोलही तितकेच मधुर आहेत. साथीदाराला भेटण्याची ओढ या गाण्यातून व्यक्त होत आहे. या गाण्याबद्दल दिग्दर्शक गणेश कदम म्हणतात, '' आज या चित्रपटातील दुसरे गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. साथीदाराबद्दल असलेली प्रेमभावना या गाण्यातून व्यक्त होत आहे. हे सुंदर गाणे नक्कीच सगळ्यांना आवडेल. नवरा बायकोच्या एकत्र बसून गप्पा मारणे, जेवण बनवणे, घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करण्यातली एक गंमत, भावनिक क्षण या गाण्यात दाखवण्यात आले आहेत. यातूनच खरं प्रेम बहरते. मंगेश कांगणे यांचे बोल आणि संतोष मुळेकर यांचे संगीत आणि त्याला लाभलेला आनंदी जोशीचा आवाज हे समीकरण खूप मस्त आहे.'' गणेश दिनकर कदम दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, श्रीधर वत्सर यांच्यासह या चित्रपटात हर्षद अतकरी, रसिका सुनील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सलमान खानची सिकंदर'च्या सेटवर 'किक 2' ची घोषणा

आलिया भट्ट आणि शर्वरी चा अल्फा, YRF चा पहिला महिला-प्रधान स्पाय चित्रपट , २५ डिसेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार!

Impostor Syndrome आजाराने त्रस्त आहे अनन्या पांडे, या सिंड्रोम बद्दल जाणून घ्या

आयुष्मान खुरानाने भारताच्या पॅरा ऑलिम्पिक स्टार्सना हृदयस्पर्शी कविता समर्पित केली

करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता, जिंकले हे बक्षीस

सर्व पहा

नवीन

बंड्याने गुरुजींसाठी चष्मा बनवला

तुम्ही दागिने घेत का नाही?

33 वर्षांनंतर पडद्यावर रजनीकांत आणि अमिताभ बच्चन जोडीचा धमाकेदार ट्रेलर वेट्टयान रिलीज

सलमान खानची सिकंदर'च्या सेटवर 'किक 2' ची घोषणा

चंद्रघंटा देवी मंदिर प्रयागराज

पुढील लेख
Show comments