Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुबोध-सोनालीने वाढवले होते वजन

subodh and sonali
Webdunia
शनिवार, 26 ऑगस्ट 2017 (15:03 IST)
पोस्टरगर्ल सोनाली कुलकर्णी आणि चतुरस्त्र अभिनेता सुबोध भावे हि दोघे प्रथमच 'तुला कळणार नाही' या सिनेमाद्वारे एकत्र काम करीत आहे. सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेला हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. प्रत्येक नवरा-बायकोच्या नात्याचे कंगोरे पडताळून पाहणाऱ्या या सिनेमासाठी सुबोध आणि सोनालीने आपले वजन वाढवले होते. लग्न होऊन पाच-सहा वर्ष झालेल्या दाम्पत्यांची भूमिका त्यांना या सिनेमात वठवायची असल्याकारणामुळे, दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दोघांना वजन वाढवण्यास सांगितले होते. भूमिकेतील पात्राची गरज म्हणून तसे करणे आवश्यक असल्याकारणामुळे, नाईलाजास्तव का असेना या दोघांना वजन वाढवावे लागले होते. या सिनेमाचा ट्रेलर पाहताना सुबोध सोनालीचे वाढलेले वजन स्पष्ट दिसून येतात. विशेष म्हणजे, या सिनेमातील सोनालीचा लूक  तिच्या चाहत्यांना अवाक करून सोडतो. कारण यात ती कमालीची वेगळी दिसत असून, तिचा ब्लंक कटदेखील लक्ष वेधून घेतो. 
मुळात सोनाली म्हंटली तर, तिचे लांब काळेभोर केस आणि कमनीय बांधा डोळ्यासमोर येतो. मात्र या सिनेमात वजन वाढवण्याबरोबरच तिने तिच्या लांब केसांवर कात्रीदेखील फिरवली असल्याचे पाहायला मिळते. असे असले तरी, मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफुल नायिकांमध्ये गणली जाणा-या सिनेमाचे चित्रीकरण संपल्यानंतर आपले वजन पुन्हा घटवले आहे. शिवाय सुबोधने देखील नियोजित पथ्यपाणी करत स्वतःला पूर्ववत आणले आहे. 
हा सिनेमा विवाहित दाम्पत्यांसाठी पर्वणीच ठरणार असून, मराठीचा  सुपरस्टार स्वप्नील जोशी यात निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय श्रेया योगेश कदम, कार्तिक निशानदार आणि अर्जुन बरन या तीकडीचा देखील या सिनेमाच्या निर्मितीत महत्वाचा हात असून,  निरव शाह,इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार यांनी सहनिर्मितीची धुरा सांभाळली आहे. सुबोध-सोनालीच्या या कॅमिस्ट्रीची झलक प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगणच्या 'रेड 2' चा टीझर प्रदर्शित,आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार

तारक मेहता मध्ये अखेर दयाबेन परत येतीये?

‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे

सनी देओलचा 'लाहोर 1947' या वर्षी प्रदर्शित होणार

अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने घेतले उज्जैन येथील बाबा महाकालचे दर्शन

व्हायरल गर्ल मोनालिसा हिला चित्रपट ऑफर करणाऱ्या दिग्दर्शकाला बलात्कार प्रकरणात अटक

'सिकंदर'च्या निर्मात्यांना धक्का, एचडी प्रिंटमध्ये चित्रपट ऑनलाइन लीक झाला

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर Omkareshwar Jyotirlinga

सलमान खानच्या सिकंदरने रिलीज होताच हा अद्भुत विक्रम केला!

पुढील लेख
Show comments