Dharma Sangrah

SUNNY- दिवाळी आधीच 'सनी' चा धमाका, म्हणतोय ‘नाचणार भाई' गावांची घमाल नावं घेऊन आलंय नवीन गाणे

Webdunia
शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (11:50 IST)
'सनी' मधील 'नाचणार भाई' हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले असून युट्यूबवर सध्या फक्त याचेच किस्से आणि गावांची धमाल नावं पाहायला मिळत आहेत. घरापासून दूर असल्यावर क्षणोक्षणी घरच्यांची आठवण येणे स्वाभाविक आहे. अशात जर जिवाभावाचे काही मित्र सापडले तर मनावरच ओझं थोडं हलकं होतं. वेगवेगळ्या गावातून एकत्र आलेल्या काही मित्रांवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या गावातून एकत्र जमलेल्या मित्रांची धम्माल, मस्ती या गाण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. या गाण्यात आपल्याला ललित प्रभाकर सोबत क्षिती जोग, अभिषेक देशमुख हे कलाकार थिरकताना दिसत आहेत. आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यास प्रोत्साहित करणारं, ताजतवानं करणारं हे गाणं प्रत्येक बर्थडे पार्टीमध्ये, आनंद सोहळ्यात हे गाणं वाजणार हे नक्की. ललित प्रभाकरचा हा हटके अंदाज प्रेक्षकांना विशेष आवडत आहे.  
 
या गाण्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, '' जेव्हा वेगवेगळ्या देशातील, भागातील मित्र शिक्षणानिमित्ताने, नोकरीनिमित्ताने एकत्र येतात तेव्हा हे मित्रच त्यांचा परिवार बनतात आणि मग आनंदाचा प्रत्येक क्षण ते त्यांच्यासोबतच साजरे करतात. हे गाणंही असाच अनुभव देणारं आहे. असा अनुभव मी स्वतःही घेतला आहे. घरापासून लांब राहणाऱ्या आणि आपल्या मातीचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकालाच हे गाणं आपल्या 'त्या' दिवसांची आठवण करून देणारं आहे.''
 
प्रसिद्ध गायक सिद्धार्थ महादेवन यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांचे शब्द लाभले आहेत. या गाण्याला सिद्धार्थ आणि सौमील यांनी संगीत दिले असून नृत्यदिग्दर्शनाची धुरा सुजीत कुमार यांनी सांभाळली आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन  प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे तर 'सनी'चे लेखन इरावती कर्णिक यांचे आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते आहेत. तसेच संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.

Harshada Varne
Published By -Smita Joshi

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धीच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सलमान खानने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली

प्रेम चोप्रा या धोकादायक आजाराशी झुंजत आहे, जावयाने खुलासा केला

शाहरुख किंवा सलमान नाही, तर हा बॉलीवूड खान २०२५ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आला सेलिब्रेटी

विशाल ददलानी यांनी संसदेत "वंदे मातरम्" वर झालेल्या १० तासांच्या चर्चेवर टीका केली

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

पुढील लेख
Show comments