rashifal-2026

स्वप्ना-स्वप्नीलची खोडकर जोडी

Webdunia
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017 (16:05 IST)
आपल्या सिनेमातून प्रेमाची परिभाषा मांडणाऱ्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी आणि मराठीचा रॉमेंटिक हिरो स्वप्नील जोशी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा लव्हस्टोरीवर सुपरहिट सिनेमा व्हायलाच हवा ! या दोघांची 'मितवा' पासूनची मैत्री आजही अगदी घट्ट आहे. विशेष म्हणजे, ही दोघे जोशी असल्याकारणामुळे अगदी सख्ख्या बहिणभावासारखी वावरताना दिसतात. त्याचप्रमाणे सेटवर धम्माल मस्ती करण्यासोबतच नवख्या कलाकारांना टार्गेट करण्याची एक संधी देखील ही जोडी सोडत नाही. स्वप्ना-स्वप्नील या खोडकर भाऊबहिणींच्या जोशीगिरीचा सामना यापूर्वी 'मितवा' मध्ये प्रथमच डेब्यू करणाऱ्या प्रर्थाना बेहेरेला करावा लागला होता, तसेच 'लाल इश्क़' च्या सेटवर अंजना सुखानी हिला देखील या दोघांनी असेच बेजार केले होते. त्यामुळे साहजिकच 'फुगे' सिनेमाद्वारे प्रथमच मराठीत पदार्पण करणारी नीता शेट्टीदेखील त्यांच्या कचाट्यातून वाचू शकली नाही. 
 
या दोघांनी तिला डीओपी प्रसाद भेंडेच्या पाया पडून त्याला १०१ रुपयाची दक्षिणा देण्याची मराठीत रीत असल्याचे सांगितले, नीताने देखील ते खरे मानत तसे केलेदेखील! कहर म्हणजे प्रसादने देखील स्वप्ना-स्वप्नीलच्या या कारस्थानात भाग घेत, तिला आशीर्वाद देऊन, दक्षिणा देखील घेतली. एव्हढेच नव्हे, तर  सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकरविषयीचे तिचे अज्ञान लक्षात आल्यावर, या दोघांनी तिला अगदी भांबावून सोडले होते. स्वप्नाने तर स्वप्नील बांदोडकरला समजलेय, आता तो तुझ्यावर रागावणार, असे काही बोलत तिला घाबरून सोडले होते.मात्र हा सारा मस्करीचा भाग असल्याचे तिला समजताच तिने देखील ते हसण्यावारी घेतले. 
 
स्वप्ना- स्वप्नीलच्या या जोशिगिरीमुळे फुगे च्या ऑफस्क्रीन सेटवर जशी धम्माल झाली, तशीच धम्माल रसिकांना या चित्रपटाच्या माध्यमातून ऑनस्क्रीन पाहायला मिळणार आहे. इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

विल स्मिथवर लैंगिक छळाचा खटला; टूर व्हायोलिन वादकाने केले गंभीर आरोप

मुस्तफिजुर रहमानमुळे शाहरुख खानवर धार्मिक गुरुंच्या निशाण्यावर !

चित्रपटगृहांनंतर 'हक' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार

सह्याद्री पर्वतरांगेत स्थित नाशिकचा हरिहर किल्ला इतिहासप्रेमी आणि सहसींना आकर्षित करतो

New Year Trip भारतातील ही ठिकाणे स्वर्गापेक्षा कमी नाहीत, नवीन वर्षात नक्कीच सहलीचे नियोजन करा

पुढील लेख
Show comments