Dharma Sangrah

Jayant Sawarkar passed away : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

Webdunia
सोमवार, 24 जुलै 2023 (13:10 IST)
social media
Jayant Sawarkar passed away : मराठी चित्रपट, नाटक , टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं .ते काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाची बातमी त्यांचा मुलाने कौस्तुभने दिली. त्यांना अण्णा म्हणून हाक मारायचे. त्यांनी सुहास शिरवाळकर यांच्या कादंबिरीवर आधारित वेबसिरीज मध्ये एका ज्योतिषाची भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी पुलं देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली पुस्तकावर आधारित शीर्षक नाटकात साकारलेली अंतू बर्वाची भूमिका अजरामर झाली. 

त्यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला. त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षांपासून अभिनयात पदार्पण केले. त्यांनी अपराध मीच केला गोळे मास्तर, अपूर्णांक ब्रम्हे,अलीबाबा चाळीस चोर खुदाबक्ष,अल्लादीन जादूचा दिवा हुजऱ्या, एकच प्याला तळीराम, सूर्यास्त’, ‘सूर्याची पिल्ले सारख्या मराठी नाटकात त्यांनी काम केलं. ते काही दिवसांपूर्वी आई कुठे काय करते या मालिकेत दिसले होते. 
 
त्यांनी आपल्या भूमिकेमुळे मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केले.आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित किंग लिअर या नाटकात मास्टर दत्ताराम यांच्यासह जयंत सावरकर यांना काम कऱण्याची संधी मिळाली. हे नाटक फार चाललं नाही मात्र जयंत सावरकर यांनी केलेली विदुषकाची भूमिका चांगलीच गाजली.त्यांच्या निधनाने मराठी सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर 25 जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

बालपणीचा एक वेदनादायक अनुभव सांगताना सोनाली कुलकर्णी भावुक झाली; म्हणाली....

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

पंजाबी गायिका इंदर कौरचा संशयास्पद मृत्यू: कालव्यात आढळला मृतदेह; ६ दिवसांपासून होती बेपत्ता

बायको उन्हाळ्यात माहेरी जाताना घालते अट

'पेड्डी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, राम चरणने आपल्या तीन वेगवेगळ्या अवतारांनी प्रेक्षकांची मने जिंकली

पुढील लेख
Show comments