Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेता राकेश बापटचे ‘व्हॉट्सॲप लव’ प्रकरण आज व्हायरल होणार

Webdunia
गुरूवार, 11 जुलै 2019 (14:00 IST)
व्हॉट्सॲप माहित नाही असा माणूस भारतात शोधून सापडणार नाही. एक प्रकारे व्हॉट्सॲप आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. व्हॉट्सॲपवर आलेल्या मेसेजचा, स्मायलीचा किंवा इमोजीचा अर्थ आपण आपल्या सोयीने घेत असतो. बहुतांशवेळा त्यामुळे अनेक समज - गैरसमज निर्माण होतात आणि पुढे प्रसरण पावतात. व्हॉट्सॲप मुळे संवाद सहज शक्य झाल्याने प्रेमभावना व्यक्त करणही खुप सोपं झालंय. एखाद्याकडून आलेला पहिला “HI” असा मेसेजही समोरच्या भिन्नलिंगी व्यक्तिला बरेच सिग्नल देतो. आणि पुढे जे काही घडतं त्यालाच व्हॉट्सॲप लव म्हणतात. हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील हॅण्डसम हंक अभिनेता राकेश बापट सध्या समाजमाध्यमांमध्ये गाजत असलेल्या त्याच्या ‘व्हॉट्सॲप लव’ प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आहे. राकेश आणि अभिनेत्री अनुजा साठे ह्या दोघांमधील हेच ‘व्हॉट्सॲप लव’ प्रकरण आज जगजाहीर होणार आहे.
 
फक्त अनुजा साठेच नाही तर इराणहून भारतात थिएटर आर्ट्स शिकण्यासाठी आलेली पर्शियन अभिनेत्री सारेह फर, हिंदी कार्यक्रमांची सुत्रसंचालिका पल्लवी शेट्टी ह्या दोघीही ह्या प्रकरणाचा भाग आहेत. आणि त्यांच्या जोडीला अनुप चौधरी आणि अनुराधा राजाध्यक्ष आदी कलावंतही व्हॉट्सॲप लव प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. 
 
व्हॉट्सॲप लव हे प्रकरण म्हणजे आजपासून प्रदर्शित होणारा एच.एम.जी एंटरटेनमेन्ट निर्मित आणि जम्पिंग टोमॅटो प्रस्तुत ‘व्हॉट्सॲप लव’ हा चित्रपट आहे. ह्या चित्रपटाची कथा ही जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या न त्या मार्गाने घडत आहे. सुखासिन आयुष्य जगणाऱ्या साध्या सरळ माणसाच्या आयुष्यात एका अनोळखी व्यक्तिकडून व्हॉट्सॲपवर आलेल्या मेसेजमुळे कसे बदल होत जातात आणि पुढे त्याचे रुपांतर कशात होते आणि परिणाम काय होतात? हे चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे.
संगीत ह्या सिनेमाचा आत्मा आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, जावेद अली, श्रेया घोषाल, पायल देव, सुफि गायक शबाब साबरी आदींनी स्वरसाज चढविला आहे. अजिता काळे आणि साहिल सुल्तानपुरी यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांना नितीन शंकर य़ांनी संगीतबद्ध केले आहे. कॉन्सर्ट किंग म्हणून संगीतविश्वात ओळखले जाणारे हेमंतकुमार महाले यांची कथा, दिग्दर्शन आणि निर्मिती असलेला तसेच अजिता काळे यांची पटकथा-संवाद असलेला ‘व्हॉट्सॲप लव’ ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश सुवर्णा यांच्या कॅमेऱ्याने टीपला आहे. आणि तो मोठ्या पडद्यावर पाहणं स्वत:लाच ट्रीट देण्यासारखं आहे. तेव्हा आजपासून महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहाद्वारे सार्वजनिक होणाऱ्या व्हॉट्सॲप लव प्रकरणाचे साक्षीदार व्हा.
“व्हॉट्सॲप वापरणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात हे प्रकरण होऊ शकते. खासकरून प्रेमात पडलेल्या, पडू इच्छिणाऱ्या आणि विवाहीत असलेल्या प्रत्येकाने ह्या व्हॉट्सॲप पासून कसे सावध राहायला हवे, जेणेकरून त्यांच्या मधुर संबंधामध्ये मीठाचा खडा पडणार नाही, हे ह्या चित्रपटात अत्यंत गमतीदार पद्धतीने मांडण्यात आले आहे, त्यामुळे प्रत्येक व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांनी हा सिनेमा अवश्य पाहावा.” - कथालेखक, दिग्दर्शक आणि निर्माता हेमन्तकुमार महाले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

सर्व पहा

नवीन

अनुपमाच्या सेटवर मोठा अपघात, विजेच्या धक्क्याने टीम सदस्याचा मृत्यू

महाराष्ट्र निवडणूक प्रचारादरम्यान अभिनेता गोविंदाची तब्बेत बिघडली

मनोकामना पूर्ण करणारे भारतातील प्रसिद्ध 5 सूर्य मंदिरे

Netflix Down भारत आणि अमेरिकेत नेटफ्लिक्स डाऊन, हजारो यूजर्स नाराज

कांगुवा' अभिनेत्री दिशा पाटनीच्या वडिलांची 25 लाखांची फसवणूक

पुढील लेख
Show comments