Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनयाचा वेल बॅलेंस साधणारी अभिनेत्री रीना अग्रवाल

Webdunia
शनिवार, 4 जून 2016 (12:03 IST)
आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अनेक मराठी अभिनेत्रींनी हिंदीत स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे, आणि त्यातील काहींनी तर या क्षेत्रात चांगलाच जम बसवला आहे. हिंदीतल्या या मराठमोळ्या चेह-यांच्या यादीत रीना वळसंगकर - अग्रवाल हिचादेखील समावेश होतो.  मराठी आणि हिंदी अशा दोन्ही क्षेत्रात अभिनयाचा वेल बॅलेंस साधणारी रीना आपल्याला लवकरच अनुप जगदाळे दिग्दर्शित  'झाला भोभाटा' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. दिलीप प्रभावळकर, संजय खापरे, कमलेश सावंत, भाऊ कदम , मयुरेश पेम अशा नामवंत कलाकारांचा अभिनय असलेला हा चित्रपट विनोदी असून, यात रीनाचा वेगळा अंदाज पाहायला मिळेल. 'अजिंठा' या मराठी सिनेमामधून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या रिनाने आतापर्यंत वठवलेल्या तिच्या भूमिकेहून वेगळी अशी व्यक्तिरेखा 'झाला भोभाटा' मध्ये साकारली आहे. कराड जवळील एका गावात सध्या या सिनेमाचे चित्रीकरण सुरु असून, या चित्रपटाविषयी मी खूप उत्सुक असल्याचे रिनाने सांगितले.  

रीनाची अजून एक वेगळी ओळख सांगायची म्हणजे  “तलाश” या हिंदी सिनेमात तिने आमिर खान सोबत काम केले आहे. यात ती एका डॅशिंग महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती.रीनाने ‘माझी बायको माझी मेहुणी’  या मराठी नाटकात अविनाश खर्शीकर यांच्यासोबतही काम केले आहे. शिवाय हिंदीच्या छोट्या पडद्यावरील  'एजंट राघव' या मालिकेमार्फत घराघरात पोहोचत असून सारा क्रिएशनचे अनुप जलोटा आणि संजना ठाकूर यांच्या ''कृष्णप्रिया' या संगीतनाटकात 'उदा बाई' आणि 'राधा' ची भूमिका करताना देखील दिसत आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

कार्तिक आर्यनला 10 वर्षांनंतर अभियांत्रिकीची पदवी मिळाली

रमणीय स्वित्झर्लंड मधील सात प्रमुख पर्यटन

शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटातील 'भसड़ मचा' या गाण्याचा धमाकेदार टीझर रिलीज

Rajmata Jijau Birthplace Sindkhed Raja राजमाता जिजाऊ जन्मस्थान, सिंदखेड राजा

कुंडली भाग्य' अभिनेत्री लग्नाच्या 5 वर्षांनंतर एका गोंडस मुलीची आई बनली

पुढील लेख
Show comments