Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रितेश देशमुखचा 'थँक गॉड बाप्पा' म्युझिक व्हिडीओ व्हायरल

Webdunia
गुरूवार, 8 सप्टेंबर 2016 (16:37 IST)
गणेशोत्सवाच्या बदलत्या रूपावर भाष्य करणारा मुंबई फिल्म कंपनी आणि स्टार प्रवाह निर्मित रितेश देशमुखचा 'थँक गॉड बाप्पा' हा म्युझिक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ३१ ऑगस्ट रोजी हे गाणं सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले. गेल्या सहा दिवसात युट्युब, ट्विटर, व्हॉट्सअप आणि हॉटस्टारच्या माध्यमातून लाखो लोकांनी हा व्हिडियो पाहिला आणि शेअर केला असून सर्वत्र या गाण्याची चर्चा आहे. #ThankGodBappa हा हॅशटॅग यामुळे चांगलाच ट्रेंड होतो आहे. 
 
रॅप ढंगातल्या या गाण्यावर अभिनेता रितेश देशमुख थिरकला असून त्यानेच हे गाणं गायलं आहे. रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुखनं मुंबई फिल्म कंपनीच्या माध्यमातून स्टार प्रवाहच्या सहकार्यानं या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे.
 
'थँक गॉड बाप्पा' हे गाणं गणेशोत्सवातल्या इतर गाण्यांपेक्षा फारच वेगळं आहे. एक निराळा विचार हे गाणे मांडते. मनोरंजन वाहिनी म्हणून काम करताना 'स्टार प्रवाह' ने कायमच सामाजिक भान जपलं आहे. मालिका आणि मनोरंजनाचे कार्यक्रम करताना समाजाला दिशा देणं हे 'स्टार प्रवाह' आपलं कर्तव्य मानते. त्याच विचारातून हे गाणं करण्यात आलं आहे.
 
जाहिरात क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या कपिल सावंत यांनी हे गाणं लिहिलं आहे. तसंच म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शनही केलं आहे. जाहिरात क्षेत्रातील प्रसिद्ध संगीतकार अमर मंगरूळकर यांनी हे गीत संगीतबद्ध केलं आहे. मनोज लोबोयांनी छायाचित्रण, अदेले परेरिया यांनी संकलन, मंदार नागावकर यांनी कला दिग्दर्शन, पुनीत जैन व अम्रिता सरकार यांनी वेशभूषा, नितीन इंदुलकर यांनी रंगभूषा केली आहे तर शिवकुमार पार्थसारथी यांनी इंग्लिश सबटायटल्सचे काम पाहिले आहे.
 
हा म्युझिक व्हिडियो व्हायरल झाल्यामुळे हे गाणे करताना त्यामागे असलेला वेगळा विचार सफल झाल्याची भावना ‘टीम थँक गॉड बाप्पा’ ची आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

पुढील लेख
Show comments