Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्नेहा झाली 'रॅगिंग'ची शिकार!

Webdunia
शुक्रवार, 6 मे 2016 (13:59 IST)
'लाल इश्क - गुपित आहे साक्षीला' चित्रपटाची हवा आता सर्व ठिकाणी चांगलीच झाली आहे. प्रत्येकाच्या तोंडी आता या चित्रपटाचीच चर्चा आहे. स्वप्नील जोशी, अंजना सुखानी, जयवंत वाडकर, पियुष रानडे, यशश्री मसुरकर, प्रिया बेर्डे, मिलिंद गवळी, उदय नेने, कमलेश सावंत, समिधा गुरु, फार्झील पेर्डीलवाला या तगड्या स्टारकास्टसोबतच या चित्रपटातून एक ग्लॅमरस नवा चेहरा मराठी चित्रपटसृष्टीला मिळणार आहे. ती आहे स्नेहा चव्हाण. आता नवीन व्यक्ती म्हटली कि त्याची थट्टा, मस्करी करणं आलंच. असचं काहीसं घडलं स्नेहाबरोबर. शुटींगच्या पहिल्याच दिवशी स्नेहाचे रॅगिंग करण्यात आले. कॉलेजमध्ये असताना जसे जुनिअर्सची हलकी फुलकी रॅगिंग केली जाते. तशीच रॅगिंग स्नेहासोबत झाली.पण हि रॅगिंग तिनेसुद्धा खूप एन्जॉय केली आहे. त्याचे झाले असे कि स्वप्नील जोशीने तिला सांगितले की,'कॅमेरामनला शकुनाचे १०१ रुपये देऊनच शुटींगला सुरुवात करायची असते. असे केले तरच तुझे करीयर सुपरहिट होईल.' त्याच्या या सुरात उपस्थित सर्वांनीच सूर मिळवला. त्यांचे हे बोलणे साध्या-भोळ्या स्नेहाला खरेच वाटले आणि ती शॉटच्या आधी कॅमेरामनला १०१ रुपये द्यायला गेले. आणि तिला पाठून हसण्याचा जोरजोरात आवाज आला. मागे वळून बघितले तर स्वप्नीलसह सर्वच टीम तिच्याकडे बघून हसत होते. तेव्हा तिला आपल्यासोबत रॅगिंग केल्याचे समजले. 
 
'हा रॅगिंगचा अनुभव माझ्यासाठी फारच मजेदार होता. या सर्वांसोबत काम करताना मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. अशीच धम्माल आम्हीसुद्धा करायचो', असे स्नेहाने सांगितले. 
 
 भन्साळी प्राॅडक्शन या बॅनरखाली संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेल्या सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केलं आहे. पटकथा व संवाद शिरीष लाटकर यांनी लिहिले आहेत. या सिनेमाची सहनिर्मिती शबीना खान यांनी केली आहे. येत्या २७ मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

पुढील लेख
Show comments