Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आफ्रिकेचा सोपा विजय, झिम्बाब्वेचे आव्हान संपुष्टात

Webdunia
WD
येथील महिंद्रा राजपक्षे स्टेडियमवर गुरुवारी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेला 10 गड्यांनी पराभूत करून विजयी सुरुवात केली, तर या पराभवामुळे झिम्बाब्वेचे आव्हान संपुष्टात आले.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर झिम्बाब्वेने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 93 धावाच काढल्या. दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष्य 12.4 षटकांत एकही गडी न गमावता गाठले.

लेव्हीने ४३ चेंडू टोलवून ६ चौकारांसह नाबाद ५0 धावा केल्या तर अमला तीन चौकारांसह ३२ धावा काढून नाबाद राहीला. या पराभवानंतर झिम्बाब्वेचे आव्हान संपले आहे. आफ्रिकेने या विजयासह सुपर एध्ये प्रवेश केला तरी २२ ला लंकेविरुद्ध होणार्‍या सामन्याद्वारे या गटात अव्वल कोण याचा निर्णय होणार आहे.

झिम्बाब्वे : मस्कद्जा झे. लेव्ही गो. मोर्केल ७, सिबांडा त्रि. गो, मोर्केल शून्य, ब्रेंडन टेलर झे. डिव्हिलियर्स गो, मोर्केल ४, इर्विन झे. डिव्हिलियर्स गो. कॅलिस ३७, मेत्सिकेनियारी झे. पीटरसन गो. कॅलिस ११, चिगंम्बुरा पायचित गो. कॅलिस १, क्रेमर झे. डिव्हिलियर्स गो. कॅलिस ६, उत्सेया झे. डिव्हिलियर्स गो. स्टेन ५, रेमन्ड प्राईस नाबाद ७, जार्विस नाबाद ९, अवांतर - ८, एकूण- २0 षटकांत ८ बाद ९३ धावा. गडी बाद क्रम- १/२, २/६, ३/१६, ४/५१, ५/५१, ६/६0, ७/७५, ८/७७. गोलंदाजी- डेल स्टेन ४-0-९-१, मोर्ने मोर्केल ४-0-१६-२, एल्बी मोर्केल ४-0-२६-१, योहान बोथा ३-0-१६-0, रॉबिन पीटरसन १-0-८-0, ज्ॉक्स कॅलिस ४-१-१५-४.

द. आफ्रिका : रिचर्ड लेव्ही नाबाद ५0 , हाशिम अमला नाबाद ३२ अवांतर : १२ एकूण- १२.४ षटकांत बिनबाद ९४ धावा. गोलंदाजी : जार्विस ३-0-२0-0, व्हेट्टोरी २-0-२१-0, प्राईस ३-0-१९-0, उत्सेया २-0-१३-0, क्रेमर २-0-१0-0,मेत्सिकेनयेरी 0.४-0-३-0.

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

Show comments