Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयपीएल : हैदराबादला विजेतेपद

Webdunia
सोमवार, 30 मे 2016 (10:51 IST)
अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 8 धावांनी पराभव करून नवव्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
 
हैदराबादने ही पहिलीच आयपीएल स्पर्धा जिंकली, तर अंतिम फेरीत बंगळुरू संघाची पराभवाची हॅट्ट्रिक झाली. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 7 बाद 208 धावा केल्यानंतर विजयासाठी 209 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ 20 षटकात 7 बाद 200 धावा करू शकला. हैदराबादच्या गोलंदाजांनी विशेषत: भुवनेश्वर कुमारने संघाची धावसंख्या सुरक्षित ठेवली. बेन कटिंगने जोर्डन आणि वॅटसनच शेवटच्या दोन षटकात 40 धावा वसूल केल्या. याच धावा बंगळुरूच्या पराभवास कारणीभूत ठरल्या. बंगळुरूला शेवटच्या दोन षटकात 29 धावांची गरज होती. शेवटच्या षटकात बंगळुरूला 18 धावा आवश्यक होत्या. मुस्तफिझूर रहेमानने 19 व्या षटकामध्ये 10 धावा दिल्या, तर भुवनेश्वर कुमारनेही शेवटच्या षटकात 10 धावा दिल्या. या दोघांनीही हैदराबादला हा रोमहर्षक विजय मिळवून दिला. 
 
बंगळुरूची सुरुवात एकदम उत्तम ठरली. डावखुरा ख्रिस गेल व कर्णधार विराट कोहली यांनी 63 चेंडूंत 114 धावांची सलामी दिली. त्याचा  झेल बिपुल शर्माने अचूकपणे टिपला. गेलने 38 चेंडूवर 4 चौकार 8 षटकारांसह 76 धावा काढल्या. त्यानंतर बरिंदर स्रनने कोहलीचा त्रिफळा घेतला. कोहलीने 35 चेंडूत 5 चौकार 2 षटकारासह 54 धावा काढल्या. कोहलीला एका आयपीएल मोसमात हजार धावा करण्याचा पराक्रम करता आला नाही. परंतु, आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. या आयपीएलमध्ये त्याने 973 धावा केल्या आहेत. बिपुल शर्माने डी’व्हिलिअर्सचा (5) अडथळा दूर केला. कटिंगने लोकेश राहुलला (11) त्रिफळाचित केले. शेन वॅटसनेही निराशा केली. रहेमानच गोलंदाजीवर हेन्रीक्वेसने त्याला टिपले. सचिन बेबीने 10 चेंडूत 1 चौकार 1 षटकारासह नाबाद 18 धावा केल. स्टुअर्ट बिन्नीने 7 चेंडूवर 1 षटकारासह 9 धावा काढल्या. परंतु, हुडाच फेरीवर यष्टिरक्षक नमन ओझाने त्याला धावचित केले. ओझानेच ख्रिस   जोर्डन (3) ला धावबाद केले. अब्दुल्ला 4 धावा काढून नाबाद राहिला. भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 25, कटिंगने 4 षटकात 35 धावात 2 गडी टिपले. हैदराबादचे क्षेत्ररक्षण सरस ठरले.
 
तत्पूर्वी कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक, युवराजसिंग आणि बेन कटिंग यांची फटकेबाजी याच्या जोरावर सनराझर्स हैदराबादने नाणेफेक  जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 208 अशी मजबूत धावसंख्या उभी केली. या अंतिम सामन्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुजरात लायन्सविरुध्द क्वाॉलिफायर-1 मध्ये खेळलेला संघच कायम ठेवला. हैदराबादने मात्र संघात एक बदल केला. बांगलादेशचा डावखुरा सीमर गोलंदाज मुस्तङ्खिजूर रहेमान हा क्वालिफायर -2 मध्ये दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्याच्याऐवजी ट्रेंट बोल्ट खेळला होता. या सामनत ट्रेंट बोल्टला संघाबाहेर ठेवण्यात आले व रहेमानचा समावेश करण्यात आला.
 
बंगळुरूचा संघ धावाचा पाठलाग करण्यात पटाईत आहे हे मला माहीत आहे; परंतु आमची गोलंदाजी ही मुख्य ताकद आहे. त्यामुळे मी प्रथम फलंदाजी घेतली, असे वॉर्नरने सांगितले. विराट कोहलीने आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेतले असते असे सांगितले. बंगळुरूने इक्बाल  अब्दुल्लावर विश्वास ठेवला. डी’व्हिलिअर्स आणि अब्दुल्ला या दोघांनी बंगळुरूला गुजरात लायन्सविरुध्द क्वालिफायर-1 मध्ये जबरदस्त भागीदारी करून विजयी केले होते. या दोन्हीही संघानी आजपर्यंत आयपीएल स्पर्धा जिंकलेली नाही. बंगळुरूने अनिल कुंबळे आणि डॅनिल व्हेट्टोरी यांच्या नेतृत्वाखाली 2009 व 2011 साली अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. हैदराबादचा संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे.
 
हैदराबादला वॉर्नर आणि शिखर धवन यांनी 6.4 षटकात 63 धावांची सलामी दिली. चहालने धवनला (28) टिपले तर जोर्डनने हेन्रीक्वेस  (4) याला टिपले. धवनचा झेल जोर्डनने घेतला तर हेन्रीक्वेसचा झेल चहालने घेतला. अरविंदने वॉर्नरचा (38 चेंडू 8 चौकार 3 षटकार 69) महत्त्वाचा बळी घेतला. अब्दुल्लाने वॉर्नरचा झेल टिपला. अरविंदनेच दीपक हुडाला तीन धावांवर टिपले.
 
युवराजसिंगने एका बाजूने 23 चेंडूवर 4 चौकार 2 षटकारासह 38 धावांची भर घातली. त्याला जोर्डनने टिपले. 5 बाद 148 वर धावगती धिमी होईल असे वाटले होते. परंतु बेन कटिंगने 15 चेंडूवर 3 चौकार 4 षटकारासह नाबाद 39 धावा केल्या. त्याने शेवटच्या दोन षटकात 39 धावा झोडपल्या. वॅटसनने शेवटच्या षटकामध्ये 23 धावा दिल्या. बंगळुरूकडून ख्रिस जोर्डनने 3 तर अरविंदने 2 बळी टिपले.
 
धावफलक :
सनराझर्स हैदराबाद : डेव्हीड वॉर्नर- झे. अब्दुल्ला गो. अरविंद 69, शिखर धवन- झे. जोर्डन गो. चहाल 28, हेन्रीक्वेस- झे. चहाल गो. जोर्डन 4, युवराजसिंग- झे. वॅटसन गो. जोर्डन 38, दीपक हुडा- झे. कोहली गो. अरविंद 3, बेन कटिंग- नाबाद 39, नमन ओझा- धावबाद 7, बिपुल शर्मा - झे. चहाल गो. जोर्डन 5, भुवनेश्वरकुमार- नाबाद 1, इतर 14, एकूण 20 षटकात 7 बाद 208.
 
गडी बाद क्रम : 1/63, 2/97, 3/125, 4/147, 5/148, 6/158, 7/174.
 
गोलंदाजी : श्रीनाथ अरविंद 4-0-30-2, ख्रिस गेल 3-0-24-0, शेन वॅटसन 4-0-61-0, जुवेंद्र चहाल 4-0-35-1, इक्बाल अब्दुल्ला 1-0-10-0, ख्रिस जोर्डन 4-0-45-3.
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : ख्रिस गेल- झे. बिपुल शर्मा गो. कटिंग 76, विराट कोहली- त्रि. गो. स्रन 54, डी’व्हिलिअर्स- झे. हेन्रीक्वेस गो. बिपुल शर्मा 5, लोकेश राहुल- त्रि. गो. कटिंग 11, शेन वॅटसन- झे. हेन्रीक्वेस गो. रहेमान 11, स्टुअर्ट बिन्नी- धावबाद 9, ख्रिस जोर्डन- धावबाद 3, इक्बाल अब्दुल्ला- नाबाद 4, इतर 9, एकूण 20 षटकात 7 बाद 200.
 
गडी बाद क्रम : 1/114, 2/140, 3/148, 4/160, 5/164, 6/180, 7/194.
 
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार 4-0-25- बरिंदर स्रन 3-0-41-1, बेन कटिंग 4-0-35-2, मुस्तफिझूर रहेमान 4-0-37-1, हेन्रीक्वेस 3-0-40-0, विपुल शर्मा 2-0-17-1.
सामनावीर : बेन कटिंग. 
 
आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा 20160
ऑरेंज कॅप
विराट कोहली, बंगळुरू
16 सामने 973 धावा
 
पर्पल कॅप
भुवनेश्वर कुमार, हैदराबाद
17 सामने 23 बळी
 
इतर लक्षणी
विराट कोहली 4 शतके
अक्षर पटेल हॅट्ट्रिक
 
अंतिम सामनर्पत
एकूण शतके 7
एकूण अर्शशतके 110
एकूण चौकार 1632
एकूण षटकार 638
एकूण बळी 652
एकूण धावा 17963

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

CSK vs RR : चेन्नईने राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला

बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठा बदल करणार,नाणेफेक बंद होणार!

CSK vs RR : आज आणि चेन्नईसाठी करो या मरोचा सामना, राजस्थानशी लढत

पुढील लेख
Show comments