Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

Webdunia
रविवार, 15 मे 2022 (10:09 IST)
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स यांचे शनिवारी रात्री टाऊन्सविले येथे 10.30 च्या सुमारास हर्वे रेंज येथे ही घटना घडली. झालेल्या कार अपघातात  सायमंड्सचा मृत्यू झाला. या दु:खद बातमीने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार,अपघातादरम्यान अँड्र्यू सायमंड्सला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.सायमंडला वाचवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले.आणि त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
 
वेग जास्त असल्याने कार रस्त्यावर पलटी झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यात सिमंड्स होते. एलिस नदीवरील पुलाजवळ हा अपघात झाला. सायमंड्स यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यांना वाचविण्यात यश आले नाही. त्यांच्या निधनाने क्रिकेट जगात शोककळा पसरली आहे. 
 
ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक अॅडम गिलख्रिस्टने 46 वर्षीय सायमंड्स यांच्या निधनाबद्दल ट्विटद्वारे दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की हे खूप वेदनादायक आहे. 

सायमंड्सने 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याची पाकिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड झाली. सायमंड्सने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला सामना 10 नोव्हेंबर 1998 रोजी खेळला. त्याने मार्च 2004 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याच वेळी, सायमंड्सने फेब्रुवारी 2005 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आक्रमक फलंदाज असण्यासोबतच तो एक चतुर गोलंदाजही होता. ते मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे संपूर्ण पॅकेज होते. 2003 आणि 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या निधनाने क्रिकेट जगात शोककळा पसरली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर इतिहास रचला

रविचंद्रन अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

या भारतीय खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती, 31व्या वर्षी घेतला मोठा निर्णय

IND W vs WI W:पहिल्या T20 मध्ये वेस्ट इंडिजचा 49 धावांनी पराभव

मुंबईने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, मध्य प्रदेशचा पाच गडी राखून पराभव केला

पुढील लेख
Show comments