Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शहरयार खान यांचे निधन

Webdunia
रविवार, 24 मार्च 2024 (11:09 IST)
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) माजी अध्यक्ष शहरयार खान यांचे शनिवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. क्रिकेट प्रशासक असण्यासोबतच शहरयार हे मुत्सद्दीही आहे. 2000 च्या दशकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट पुन्हा सुरू करण्यात शहरयारने महत्त्वाची भूमिका बजावली होती. शहरयारने 2003 ते 2006 दरम्यान पीसीबीमध्ये जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या कार्यकाळात भारताने दोनदा पाकिस्तानला भेट दिली. यानंतर ते 2014 ते 2017 या काळात पीसीबीचे अध्यक्षही होते. याशिवाय 1999 मध्ये भारत दौऱ्यावर आणि 2003 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ते पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक होते.
 
पीसीबीचे माजी अध्यक्ष शहरयार यांचेही भारताशी संबंध होते. त्यांचा जन्म भोपाळ येथे झाला आणि ते येथील राजघराण्यातील सदस्य होते. याशिवाय शहरयार हा माजी भारतीय कर्णधार मन्सूर अली खान पतौडीचा चुलत भाऊ होता. शहरयार हे 1990 ते 1994 या काळात पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव होते आणि भारत आणि इंग्लंडमध्ये उच्चायुक्त म्हणूनही तैनात होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी शहरयार खान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, पीसीबीच्या वतीने मी आमचे माजी अध्यक्ष शहरयार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो
 
Edited By- Priya Dixit  
 
 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

RR vs DC : आज ऋषभ पंत साठी करो या मरोचा सामना, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीचा जिंकण्याचा प्रयत्न असणार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

SRH vs MI :मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला

IND vs BAN Women's T20: भारतीय महिला संघाचा बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय

पुढील लेख
Show comments