सध्या T20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर-8 फेरीचे सामने खेळले जात आहेत. सुपर-8 फेरीतील आपला दुसरा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. या सामन्यात भारतीय संघ बांगलादेश संघाशी भिडणार आहे.
सुपर-8 फेरीतील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असेल. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला होता.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर होणार आहे. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता नाणेफेक सुरू होईल.
भारतीय संघाने हा सामना जिंकल्यास ते उपांत्य फेरीत जवळपास पोहोचतील. त्याचबरोबर बांगलादेशला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल.
दोन्ही संघांची पथके
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तस्किन अहमद, लिटन दास, सौम्या सरकार, तनजीद हसन तमीम, शाकिब अल हसन, तौहीद ह्रदोय, महमूद उल्लाह रियाद, जाकर अली अनिक, तन्वीर इस्लाम, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, मुस्तफिजुर रहमान. शरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकीब.