Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs PAK T20 World Cup 2022: विराटने दिली दिवाळी भेट,भारताने चित्तथरारक सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला

Webdunia
रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (17:43 IST)
T20 World Cup 2022 T20 विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगला. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ सुमारे एक लाख प्रेक्षकांसमोर खेळत होते. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत आठ गडी गमावून 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने अखेरच्या चेंडूवर सहा विकेट्स राखून सामना जिंकला.
 
 सुपर-12 च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला. विराट कोहलीने भारतीय चाहत्यांना दिवाळी भेट दिली आहे. या सामन्यात त्याने 53 चेंडूत 82 धावांची नाबाद खेळी खेळली. 
 
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत आठ गडी गमावून 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने एका क्षणी 31 धावांत चार विकेट गमावल्या होत्या.
 
यानंतर हार्दिक पांड्याने विराट कोहलीसोबत पाचव्या विकेटसाठी 78 चेंडूत 113 धावांची भागीदारी केली. शेवटच्या पाच षटकात भारताला विजयासाठी 60 धावांची गरज होती. 16व्या षटकात सहा धावा आणि 17व्या षटकात सहा धावा झाल्या.
 
18व्या षटकात कोहलीने गियर बदलला आणि शाहीन आफ्रिदीच्या षटकात तीन चौकार मारले. भारताने 18व्या षटकात 17 धावा केल्या. टीम इंडियाला शेवटच्या दोन षटकात ३१ धावांची गरज होती. कोहलीने 19व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले. त्या षटकात हरिस रौफ गोलंदाजी करत होता.
 
भारताला शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती. मोहम्मद नवाज गोलंदाजीसाठी आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हार्दिक 37 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. दुसऱ्या चेंडूवर कार्तिकने एक धाव घेतली. कोहलीने तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments