आयसीसीने भारत-ऑस्ट्रेलियाचे कसोटी मालिकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ३ डिसेंबरला ब्रिस्बेन येथे कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ केविन रॉबर्ट्स हे शुक्रवारी (दि.२९) अधिकृत घोषणा करणार आहेत. भारतीय संघ कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे .
डे नाईट टेस्ट मॅच
पहिली कसोटी - ३ ते ८ डिसेंबर (ब्रिसबेन), दुसरी कसोटी (दिवस-रात्र) - ११ ते १५ डिसेंबर (अडलेड ओव्हल), तिसरी कसोटी (बॉक्सिंग डे) - २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न), चौथी कसोटी - ३ ते ७ जानेवारी (सिडनी)
ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत एकूण ८ डे-नाईट सामने खेळले आहेत. यातील ७ सामन्यात विजय मिळवला असनू १ सामना ड्रॉ झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर हिटमॅन रोहित शर्मा म्हणाला, की यावेळी वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ ऑस्ट्रेलिया संघात असल्यामुळे सामना थोडा अवघड असणार आहे.