rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आय पी एल आता दूरदर्शनवर लाइव्ह

IPL 20158
, शुक्रवार, 6 एप्रिल 2018 (17:02 IST)
सर्वांसाठी आनंदी अशी बातमी आहे कारण यावेळी प्रथमच आयपीएलचे सामने दूरदर्शनवर दाखवण्यात येणार आहेत. त्यात मात्र दूरदर्शनाला फक्त  रविवारी होणाराच सामना दाखवता येणार आहे. त्यातही हा सामना एक तास उशिरा दाखवावा लागेल. स्टार स्पोर्ट्सकडे आयपीएलच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क आहेत. त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा प्रस्ताव मान्य केल्याने यंदा दूरदर्शनवर आयपीएलचे सामने पाहता येणार आहेत. स्टार स्पोर्ट्सने आयपीएलच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क सप्टेंबरमध्ये खरेदी केले होते. यानंतर हे सामने आठवड्यातून एकदा दूरदर्शनवर दाखवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्टार स्पोर्ट्सला दिला होता. त्यामुळे आता दूरदर्शनला आठवड्यातून एकदा (रविवारी) आयपीएल सामना दाखवण्यात येईल. अनेकदा रविवारी आयपीएलचे दोन सामने असतात. मात्र त्यापैकी एकच सामना दूरदर्शनवर दाखवला जाईल. त्यामुळे रविवारी का होईना अनेक नागरिकांना हे सामने बघता येणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

2 थेंब युरीन विकून 25 डॉलर कमावणारी मुलगी