Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IPL 2022: गौतम गंभीरने उघड केले लखनऊ संघाचे नाव, आता 'या ' नावाने ओळखली जाणार फ्रेंचायजी

Webdunia
बुधवार, 12 जानेवारी 2022 (19:55 IST)
आयपीएल 2022 मध्ये दोन नवीन संघ खेळताना दिसणार आहेत. यामध्ये अहमदाबाद आणि लखनौमधील दोन नवीन फ्रँचायझींचा समावेश आहे. मंगळवारी दोन्ही फ्रँचायझींना बीसीसीआयकडून ग्रीन सिग्नल मिळाला. आता हे दोन्ही संघ लवकरच त्यांच्या खेळाडूंची आणि कोचिंग स्टाफची घोषणा करू शकतात.
 आयपीएलच्या कार्यकारी परिषदेने मंगळवारी लिलाव तारखा जाहीर केले आहे. बेंगळुरूमध्ये 12आणि 13 फेब्रुवारीला होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी दोन्ही संघांना आपापल्या संघांची नावे जाहीर करायची आहेत. मात्र, लखनऊ संघाचा मेंटॉर बनवण्यात आलेल्या गौतम गंभीरने सोशल मीडियावर नाव जाहीर केले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gautam Gambhir (@gautamgambhir55)

गौतम गंभीरने इंस्टाग्रामवर लखनऊसह त्याच्या दुसऱ्या नावाची तीन अक्षरे लिहिली आहेत. त्यापाठोपाठ A आणि N ही दोन अक्षरे आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडिया यूजर्स दोन नावांचा अंदाज लावत आहेत. लखनऊ संघाचे नाव लखनौ रेंजर्स किंवा लखनऊ पँथर्स असू शकते, असे ते म्हणतात.
त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की , "श्श्शश्श... नावाची घोषणा लवकरच केली जाईल. यासाठी अजून थोडा वेळ थांबा.” यासोबत त्याने #Naam Banao Naam Kamao आणि टीम लखनऊचा उल्लेखही केला. आपण  हे गुप्त ठेवू शकता का, असेही त्याने फोटोमध्ये लिहिले आहे. लखनौने माजी सलामीवीर गंभीरला मेंटर आणि अँडी फ्लॉवरला मुख्य प्रशिक्षक बनवले आहे. असे मानले जाते की संघ केएल राहुलची निवड करेल आणि त्याला कर्णधार म्हणून नियुक्त करेल.

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

T20 World Cup : बांगलादेशने T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला

IPL 2024 मध्ये एक नवा विक्रम रचला,पहिल्यांदाच इतके षटकार लागले

पुढील लेख
Show comments