Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IPL Auction: पॅट कमिन्सला मिळणार 15.50 कोटी ; KKRकडे

Webdunia
गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (17:09 IST)
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या 13व्या हंगामासाठी लिलाव कोलकाता इथं सुरू झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने फास्ट बॉलर पॅट कमिन्ससाठी तब्बल 15.50 कोटींची बोली लावत त्याला संघात समाविष्ट केलं.
 
पॅट कमिन्स आयसीसी टेस्ट रेटिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. वनडे रेटिंगमध्ये कमिन्स चौथ्या स्थानी आहे. गेल्या वर्षभरात कमिन्सच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने महत्त्वपूर्ण विजय मिळवले आहेत.
 
किंग्ज इलेव्हन पंजाबने ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलला 10.75 कोटी रुपये देऊन विकत घेतलं. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ख्रिस मॉरिससाठी 10 कोटी रुपयांची बोली लावत विकत घेतलं.
 
दिल्ली कॅपिटल्स संघाने ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर अॅलेक्स कारेला 2.4 कोटी रुपये देऊन संघात समाविष्ट केलं. कारेने यंदा झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या बॅटिंग आणि कीपिंगने सर्वांना प्रभावित केलं होतं.
 
डावखुरा बॉलर जयदेव उनाडकतला राजस्थान रॉयल्सला पुन्हा ताफ्यात घेतलं. जयदेवसाठी राजस्थानने 3 कोटी रुपये मोजले.
 
मुंबई इंडियन्सने धडाकेबाज बॅट्समन ख्रिस लिनला 2 कोटी रुपयांना विकत घेतलं.
 
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक बॅट्समन आरोन फिंचसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने 4.4 कोटी रुपये खर्च केले. आरोन फिंचचा हा आठवा संघ आहे.
 
कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयोन मॉर्गनला 5.25 कोटी रुपये खर्च करून ताफ्यात समाविष्ट केलं.
 
राजस्थान रॉयल्सने रॉबिन उथप्पासाठी 3 कोटी रुपये खर्च केले.
 
जेसन रॉयला 1.5 कोटींना दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतलं.
 
चेतेश्वर पुजारा, युसुफ पठाण, स्टुअर्ट बिन्नी, कॉलिन डी ग्रँडहोम यांना लिलावाच्या पहिल्या टप्प्यात कोणीही विकत घेतलं नाही.
 
संघांची आजची खरेदी आणि मूळ संघ
चेन्नई सुपर किंग्स-सॅम करन
 
संघ- महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डू प्लेसिस, हरभजन सिंग, इम्रान ताहीर, जगदीशन नारायण, करण शर्मा, केदार जाधव, लुंगी एन्गिडी, मिचेल सँटनर, मोनू सिंग, मुरली विजय, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, शार्दूल ठाकूर.
 
मुंबई इंडियन्स-ख्रिस लिन, नॅथन कोल्टिअर नील
 
रोहित शर्मा, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कीरेन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मक्लेघान, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, शेरफन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट.
 
राजस्थान रॉयल्स-रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकत
 
स्टीव्हन स्मिथ, बेन स्टोक्स, जोस बटलर, अंकित राजपूत, जोफ्रा आर्चर, महिपाल लोमरुर, मनन व्होरा, मयांक मार्कंडे, राहुल टेवाटिया, रियान पराग, संजू सॅमसन, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, वरुण आरोन
 
किंग्ज इलेव्हन पंजाब- ग्लेन मॅक्सवेल
 
अर्शदीप सिंग, ख्रिस गेल, दर्शन नालकांदे, के.गौतम, हार्डुस व्हिलऑन, हरप्रीत बार, जगदीश सुचिथ, करुण नायर, लोकेश राहुल, मनदीप सिंग, मयांक अगरवाल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, मुरुगन अश्विन, निकोलस पूरन, सर्फराझ खान

सनरायझर्स हैदराबाद
 
जॉनी बेअरस्टो, अभिषेक शर्मा, बसिल थंपी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टॅनलके, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाझ नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी.नटराजन, विजय शंकर, वृद्धिमान साहा. 
 
कोलकाता नाईट रायडर्स-पॅट कमिन्स, आयोन मॉर्गन
 
आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, हॅरी गुर्ने, कमलेश नागरकोट्टी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नरिन 
 
दिलली कॅपिटल्स-ख्रिस वोक्स, जेसन रॉय, अॅलेक्स कारे,
 
अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, अमित मिश्रा, अवेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, कीमो पॉल, रवीचंद्रन अश्विन, संदीप लमाचीने, शिखर धवन , श्रेयस अय्यर 
 
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू-ख्रिस मॉरिस, आरोन फिंच
 
एबी डीव्हिलियर्स, विराट कोहली, देवदत्त पडिकल, गुरकीरत सिंग मान, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

मुंबईने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, मध्य प्रदेशचा पाच गडी राखून पराभव केला

MUM vs MP: मुंबईचे देशांतर्गत क्रिकेटवर वर्चस्व,जिंकले सय्यद मुश्ताक ट्रॉफीचे विजेतेपद

हेड आणि स्मिथच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने 400 ओलांडली, बुमराहने 5 विकेट घेतल्या

राहुल द्रविडचा मुलगा अन्वय याने विजय मर्चंट ट्रॉफी सामन्यात नाबाद शतक झळकावले

Champions Trophy:भारतीय संघाचे सामने दुबईत होणार,लवकरच अधिकृत घोषणा

पुढील लेख
Show comments