Festival Posters

वेगवेगळे कर्णधार असणे पटत नाही : धोनी

Webdunia
शनिवार, 14 जानेवारी 2017 (16:13 IST)
वेगवेगळे कर्णधार ही संकल्पना माझ्या दृष्टीने योग्य नाही. कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यामुळे मी र्मयादित षटकांच्या संघांचेही कर्णधारपद सोडले, असे कारण माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पुढे केले आहे.
 
भारत आणि इंग्लंडमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत माजी कर्णधाराने स्पष्ट केले की, कसोटी आणि र्मयादित षटकांसाठी दोन कर्णधार होते. हे मला पटले नाही. मी आधीच कसोटी क्रिकेटचा राजीनामा दिला होता म्हणूनच मी कर्णधारपद सोडले. याशिवाय माझ्याकडून कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारलेल्या विराट कोहलीने कुशल कर्णधार म्हणून आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे र्मयादित षटकांच्या संघांचे नेतृत्व करताना त्याला कोणतीही अडचण जाणवणार नाही, असे मला वाटले. कोहलीला वेळोवेळी आपण सल्ला देऊ आणि आपले क्षेत्ररक्षकांच्या स्थानावर लक्ष असेल, असेही धोनीने सांगितले. फलंदाजीतील आपल्या क्रमांकाविषयी धोनीने सांगितले, खरे तर मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करून अधिक धावा करण्याची संधी मिळाली असती, पण मला वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाचे हित अधिक महत्त्वाचे वाटले. माजी कर्णधाराच्या मते कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कोठेही सामने जिंकू शकेल.
सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या सुपर 8 सामन्यासाठी टीम इंडिया चेन्नईत पोहोचली

ZIM vs WI: वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला हरवून त्यांचा दुसरा सर्वात मोठा टी२० विजय मिळवला

हार्दिक पंड्याने मुलगा अगस्त्यला ४ कोटी रुपयांची आलिशान कार भेट दिली, माजी पत्नी नताशा स्टॅनकोविचने ती स्वीकारली

T20 World Cup: १२ सामन्यांनंतर भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी पराभव

Shikhar Dhawan : शिखर धवनने दुसरे लग्न केले, जाणून घ्या कोण आहे सोफी शाईन

पुढील लेख
Show comments