Marathi Biodata Maker

महेंद्रसिंह धोनी बनला सीझनमधील सिक्सर किंग

Webdunia
शनिवार, 5 मे 2018 (11:37 IST)
कोलकाता नाइट राडर्सने अकराव्या आयपीएल टी-20 मधील परतीच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सहा गडी राखून पराभव केला असला तरी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी या हंगामातील सिक्सर किंग ठरला आहे.
 
अकराव्या हंगामातील साखळी सामन्यात धोनीने नऊ डावात 24 षटकार खेचले आहेत. ख्रिस गेल, ए.बी. डी'व्हिलिअर्स, आंद्रे रसेल (प्रत्येकी 23 षटकार) यांना धोनीने मागे टाकले. धोनीने कोलकाताविरुध्द 12 व्या षटकात फलंदाजीस येऊन नाबाद 43 धावा काढल्या. धोनीने चार षटकार व एक चौकार खेचला.
 
धोनी हा प्रचंड फॉर्ममधए आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या विजयात मोठे योगदान दिले आहे. धोनीच्या वयाचा मुद्दा उपस्थित करणार्‍या सर्वच टीकाकारांची तोंडे धोनीने बंद करून टाकली आहेत.
 
चेन्नईने या आयपीएल साखळी सामन्यात 5 बाद 177 धावा काढल्या. कोलकाताने 17.4 षटकात 4 बाद 180 धावा काढल्या. शुभन गील आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांनी पाचव्या जोडीस नाबाद 83 धावांची भागीदारी करून कोलकाताला विजयी केले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

DC vs RCB :आरसीबीने नऊ गडी राखून विजय मिळवला, दिल्लीचा धुव्वा उडवला

IND vs SA, 5th T20I: भारताचा दारुण पराभव, दक्षिण आफ्रिकेने मालिका 4-1 ने जिंकली

RCB vs DC : हंगामातील ३९ वा साखळी सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणार

KKR vs LSG : सुपर ओव्हरमध्ये केकेआरचा थरारक विजय, एलएसजीचा पराभव

CSK vs GT : गुजरात टायटन्सने ८ गडी राखून एकतर्फी विजय नोंदवला

पुढील लेख
Show comments