Marathi Biodata Maker

महिलांच्या आयपीएलसाठी ही योग्य वेळ नाही : मिताली

Webdunia
गुरूवार, 22 मार्च 2018 (15:02 IST)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) धर्तीवर महिलांसाठीही लीग सुरू करावी, या तर्कहीन चर्चांना भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने पूर्णविराम दिला आहे. महिला क्रिकेटपटूंची दुसरी फळीच तयार नसल्याने आता ही लीग खेळवण्यात काहीच अर्थ राहणार नाही, असे स्पष्ट मत तिने व्यक्त केले आणि ही फळी तयार होण्यासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागेल, असे तिने सांगितले.
 
गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र, अजूनही आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक खेळाडू यांच्यात बराच फरक असल्याचे मितालीला वाटते. 'आयपीएलसारख्या लीगमध्ये खेळण्यास योग्य असलेल्या खेळाडूंची फळी निर्माण होण्याची आवश्यकता आहे. भारत 'अ' संघाकडेही सक्षम खेळाडूंची फळी नाही. त्यामुळे जेव्हा अनेक सक्षम खेळाडूंची फळी आपल्याकडे तयार होईल, तेव्हा महिलांच्या आयपीएल लीगचा विचार करणे योग्य ठरेल. आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक खेळाडूंमध्ये बरेच अंतर आहे आणि अशापरिस्थितीत आयपीएलसारखी लीग खेळवणे महिला क्रिकेटच्या प्रसारासाठी घातक ठरेल,' असे स्पष्ट मत मितालीने व्यक्त केले.
 
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हार पत्करावी लागल्यानंतर भारतीय महिला संघ तिरंगी मालिकेत चांगल्या कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाने भारत 'अ' संघाविरुद्ध सराव सामन्यात विजय मिळवले. 'भारत अ' ही संकल्पना आम्ही नुकतीच राबवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दुसरी फळी तयार होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागेल. या संघात गुणवत्ता असलेले युवा खेळाडू आहेत, परंतु त्यांना पुरेशी संधी मिळायला हवी. असे मिताली म्हणाली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यासाठी आणि महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी मुंबईहून रवाना

विश्वचषक संघातील भारतीय क्रिकेटपटू विजय शंकर यांनी निवृत्ती जाहीर केली

SRH vs RCB: सनरायझर्स हैदराबादने हा सामना ५५ धावांनी जिंकला

Women’s T20 World Cup 2026 : महिला टी२० विश्वचषक यावर्षी जूनमध्ये होणार; एकूण १२ संघ ट्रॉफीसाठी स्पर्धा करताना दिसतील

विश्वचषक संघात स्थान मिळवलेल्या भारतीय स्टार खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केली

पुढील लेख
Show comments