Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतला आयसीसीकडून मानाचा पुरस्कार जाहीर

Pantla
Webdunia
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (12:58 IST)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2021 पासून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू असा नवा पुरस्कार सुरू केला आहे आणि पहिल्याच पुरस्काराचा मानकरी ठरला आहे तो भारताचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत.
 
जानेवारी महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत होता. या मालिकेत  पंतने दोन डावांत संस्मरणीय खेळी केली. तिसर्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने 97 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. तर चौथ्या सामन्यात त्याने नाबाद 89 धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या याच खेळीमुळे त्याला जानेवारी 2021 मधील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
 
पंतने जानेवारी महिन्यात 4 डावांत 245 धावा केल्या. 81.66 च्या सरासरीने त्याने धावा कुटल्या. त्याने 4 झेल टिपले. तसेच एका सामन्यात सामनावीराचा किताबही मिळवला. त्यामुळे आयसीसीच्या मतदान समितीने आणि चाहत्यांनी मिळून या पुरस्कारासाठी पंतची निवड  केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

CSK vs PBKS: हंगामातील 49 वा लीग सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात चेपॉक स्टेडियमवर, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

IND W vs SA W: भारताने दक्षिणआफ्रिकेला पराभूत करून 15 धावांनी सामना जिंकला

मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची यादी जाहीर,या खेळाडूंना स्थान मिळाले

DC vs KKR : कोलकाताने दिल्ली कॅपिटल्सचा 14 धावांनी पराभव केला

कोण आहे वैभव सूर्यवंशी? वयाच्या १४ व्या वर्षी ३५ चेंडूत तुफानी शतक, जगभर चर्चा

पुढील लेख
Show comments