Dharma Sangrah

रविचंद्रन अश्विनला मिळाली खास कॅप

Webdunia
शुक्रवार, 8 मार्च 2024 (09:53 IST)
भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने धर्मशाला कसोटीत मैदानात उतरताच इतिहास रचला. 100वी कसोटी खेळणारा तो भारताकडून 14वा खेळाडू ठरला. त्याच्याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सौरव गांगुली, विराट कोहली, इशांत शर्मा, हरभजन सिंग, चेतेश्वर पुजारा आणि वीरेंद्र सेहवाग यांनी ही कामगिरी केली आहे. हा सोहळा खास बनवण्यासाठी त्याला धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खास पद्धतीने टेस्ट कॅप देण्यात आली.

या खास सोहळ्यासाठी अश्विनची पत्नी प्रीती आणि त्याच्या दोन मुलीही स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. भारतीय खेळाडू स्टेडियममध्ये एका रांगेत उभे होते. समोर, अश्विनची 100 वी कसोटी कॅप स्मृतीचिन्ह ठेवल्याप्रमाणे एका खास पद्धतीने पॅक करून ठेवली होती. यानंतर पत्नी आणि मुलींना बोलावून ते अश्विनच्या जवळ उभे राहिले. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने अश्विनबद्दल काही शब्द सांगितले. त्यानंतर त्याने अश्विनकडे टेस्ट कॅप दिली. यावेळी भारतीय खेळाडू टाळ्या वाजवत राहिले. प्रीती भावूक दिसत होती. सर्व खेळाडूंनी अश्विनला मिठी मारून अभिनंदन केले. भारतीय खेळाडूंनी त्यांना गार्ड ऑफ ऑनरही दिला. बीसीसीआयनेही अनेक फोटो शेअर केले आहेत.
 
अश्विनसाठी ही मालिका सोपी राहिलेली नाही. राजकोटमधील मालिकेतील तिस-या सामन्यात 500 विकेट्स पूर्ण केल्यानंतर अश्विनला अचानक मायदेशी परतावे लागले. 
 
Edited By- Priya Dixit    
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

ब्रिटिश ब्रॉडकास्ट इंजिनिअर इयान विल्यम्स लँगफोर्ड यांचा मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू

RR vs CSK:राजस्थानने चेन्नईला आठ गडी राखून हरवले, वैभवने अर्धशतक झळकावले

CSK vs RR:राजस्थान आणि चेन्नई आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करणार

MI vs KKR: मुंबई इंडियन्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर सहा गडी राखून विजय

रविचंद्रन अश्विन अमेरिकन फ्रँचायझी मेजर लीग क्रिकेट एमएलसीमध्ये सामील होणार

पुढील लेख
Show comments