Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयपीएलनंतर खेळाडूंना विश्रांती द्या : शास्त्री

आयपीएलनंतर खेळाडूंना विश्रांती द्या : शास्त्री
नवी दिल्ली , शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (15:30 IST)
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयपीएलच्या आगामी हंगामानंतर खेळाडूंसाठी विश्रांतीची मागणी केली आहे. 
 
शास्त्री म्हणाले की, हे खूपच महत्त्वाचे आहे की, खेळाडूंना दोन आठवड्यांची विश्रांती मिळायला पाहिजे. क्वारंटाइनचा वेळ आणि बायोबबलमधील निर्बंध यामुळे खेळाडूंना  मानसिकरीत्या खूप थकवा आलेला असू शकतो. अशातच महत्त्वाचे आहे की, भारतीय क्रिकेटपटू यावर्षी होणार्याल भरगच्च वेळापत्रकामुळे ताजेतवाने राहिले पाहिजेत. शास्त्री यांनी एका चॅनलशी चर्चा करताना मान्य केले की, इंग्लंडविरुध्दच्या मालिकेनंतर भारतीय खेळाडू थेट आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. शिवाय इंग्लंडविरुध्दची मालिकाही दीर्घ काळ चालणार आहे. अशातच खेळाडू अन्य टुर्नामेंटमध्ये खेळण्यापूर्वी त्यांना कमीत कमी दोन आठवड्यांचा आराम देणे आवश्यक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्यानमारच्या सत्तांतरानंतर आता Twitter आणि इंस्टाग्रामवरही बंदी