Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Sachin Tendulkar Deepfake Video सचिन तेंडुलकर प्रकरणात नवा ट्विस्ट, मुंबई सायबर पोलिसांनी कारवाई केली

Webdunia
गुरूवार, 18 जानेवारी 2024 (17:37 IST)
Sachin Tendulkar Deepfake Video दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा जुना व्हिडिओ नुकताच एका गेमिंग अॅपद्वारे त्याच्या जाहिरातीसाठी दुरुपयोग करण्यात आला. या प्रकरणी सचिनने X वर पोस्ट केल्यानंतर केंद्रीय आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही प्रतिक्रिया दिली होती आणि कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले होते. आता याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी कारवाई केली असून याप्रकरणी गेमिंग अॅप आरोपीविरुद्ध एफआयआरही नोंदवला आहे.
 
सायबर पोलिसांनी कारवाई केली
सचिन तेंडुलकरचा जुना व्हिडिओ मॉर्फ करून त्याचा गैरवापर केल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी कारवाई केली. सायबर पोलिसांनी गेमिंग अॅपविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. खुद्द सचिन तेंडुलकरने सोमवारी X वर तो व्हिडिओ पोस्ट करताना ही माहिती दिली. या व्हिडिओमध्ये सचिनच्या आवाजाची मिमिक्री करून व्हॉईस ओव्हर करण्यात आला आहे. सचिनच्या मूळ व्हिडिओचा आवाज म्यूट करून तो आवाज वापरण्यात आला होता.
 
यामध्ये सचिनची मुलगी (सारा तेंडुलकर) देखील हे अॅप वापरत असल्याचे बोलले जात होते. या प्रकरणावर मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सचिनच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना आधीच म्हटले होते की, '#DeepFakes आणि AI द्वारे देण्यात येत असलेली चुकीची माहिती भारतीयांची सुरक्षा आणि आत्मविश्वास धोक्यात आणत आहे. या प्रकरणाशी संबंधित आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर कारवाई करून बंद करण्यात येईल. तसेच आयटी कायद्यांतर्गत याप्रकरणी नवीन नियम बनविण्याबाबतही त्यांनी सांगितले.
 
सारा तेंडुलकरही बळी ठरली होती
सचिन हा अशा प्रकारचा पहिला बळी नाही. यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मानधना हिचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका ब्रिटीश महिलेच्या व्हिडिओवर‍ तिचा चेहरा सुपरइम्पोज करण्यात आला होता. त्यानंतर ते व्हायरल झाले. त्याचवेळी सचिनची मुलगी सारा तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्या फोटोंचाही गैरवापर करण्यात आला आणि अर्जुनच्या जागी शुभमन गिलला बसवण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर इतिहास रचला

रविचंद्रन अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

या भारतीय खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती, 31व्या वर्षी घेतला मोठा निर्णय

IND W vs WI W:पहिल्या T20 मध्ये वेस्ट इंडिजचा 49 धावांनी पराभव

मुंबईने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, मध्य प्रदेशचा पाच गडी राखून पराभव केला

पुढील लेख
Show comments