Marathi Biodata Maker

शुभमन गिलने स्फोटक शतक झळकावले, सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला

Webdunia
शनिवार, 21 सप्टेंबर 2024 (16:16 IST)
चेन्नई कसोटीत तिसऱ्या दिवशी शुभमन गिलची बॅट चांगलीच खेळली. भारताच्या दुसऱ्या डावात गिलने बांगलादेशच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. ऋषभ पंतसोबत 167 धावांची शानदार भागीदारी केली.
पंत 109 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर लगेचच शुभमन गिलने स्फोटक शतक झळकावले. पंत ने शतक झळकावून  109 धावांचे योगदान दिले. 
 
 शुभमन गिलने स्फोटक शतक झळकावले. गिलने 161 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील 5 वे शतक आहे आणि 2024 मधील तिसरे कसोटी शतक आहे.
 
2022 सालापासून त्याच्या बॅटचे हे 12वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. अशाप्रकारे, तो 2022 नंतर सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने बाबर आझम, विराट कोहली आणि जो रूट यांना मागे टाकले आहे. 
 
भारतासाठी कसोटीत 5 वे शतक झळकावणारा शुभमन गिल हा 8वा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला. या प्रकरणात गिलने विराट कोहलीचा विक्रम मोडला.

या शतकामुळे गिल आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिप म्हणजेच WTC च्या इतिहासात सर्वाधिक शतके करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने मयंक अग्रवाल, ऋषभ पंत आणि विराट कोहली यांना मागे टाकले. कर्णधार रोहित शर्माने WTC मध्ये भारतासाठी सर्वाधिक 9 शतके झळकावली आहेत
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पलाशशी ब्रेकअपनंतर स्मृती मानधनाने घेतली बॅट, श्रीलंका दौऱ्यासाठी तयारी सुरू

टी20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून दोन प्रमुख खेळाडूंना वगळले

IPL 2026 Auction: सुनील गावस्कर भडकले, अशा खेळाडूंवर एक सेकंदही वाया घालवू नये

शुभमन गिलचे टीम इंडियामध्ये पुनरागमन, कटक T20 साठी संघात सामील

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर कोहली लंडनला रवाना; विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी भारतात परतणार

पुढील लेख
Show comments