Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

T20 Series: बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

Webdunia
मंगळवार, 16 एप्रिल 2024 (19:47 IST)
या महिन्यापासून बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी सोमवारी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली. या महत्त्वाच्या मालिकेसाठी फिरकीपटू आशा शोभना आणि फलंदाज सजना सजीवन यांना भारतीय महिला संघात स्थान देण्यात आले. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला 28 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.
 
लेगस्पिनर शोभनाने फेब्रुवारीमध्ये झालेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये चांगलीच छाप पाडली होती .  शोभनाने WPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चे प्रतिनिधित्व केले. आरसीबीने डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. शोभनाने आरसीबीच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली आणि 10 सामन्यात 12 विकेट घेतल्या. दुसरीकडे, सजीवनने या स्पर्धेत मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आणि मुंबई इंडियन्ससाठी उपांत्य फेरीत 74 धावा केल्या.आरसीबीची श्रेयंका पाटील देखील संघात आहे, तर डी हेमलताने ऑक्टोबर 2022 नंतर पुनरागमन केले आहे.

भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या मालिकेसाठी संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर असेल. ही मालिकाही महत्त्वाची आहे कारण या वर्षाच्या अखेरीस बांगलादेशमध्ये टी-२० विश्वचषकही होणार आहे. उभय संघांमधील मालिकेतील पाचही सामने सिलहटमध्ये खेळवले जातील. या मालिकेतील सामने 28, 30 एप्रिल, 2 मे, 6 मे आणि 9 मे रोजी होणार आहेत.
बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे आहे:
 
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, डी हेमलता, सजना सजीवन, रिचा घोष, यस्तिका भाटिया, राधा यादव, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, सायका इशाक, आशा शोभना, रेणुका सिंह ठाकूर, तीतस साधू.

Edited By- Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

RR vs DC : आज ऋषभ पंत साठी करो या मरोचा सामना, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीचा जिंकण्याचा प्रयत्न असणार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

SRH vs MI :मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला

IND vs BAN Women's T20: भारतीय महिला संघाचा बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय

पुढील लेख
Show comments