Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टी 20 वर्ल्ड कप : नेदरलँड्सचा दक्षिण आफ्रिकेवर विजय; भारत सेमी फायनलमध्ये

Webdunia
रविवार, 6 नोव्हेंबर 2022 (10:04 IST)
ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँडविरुद्ध पराभव झाला. या पराभवामुळे भारत सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे.
 
ग्रुप-2 च्या या मॅचनंतर गुणतक्त्यात भारत 6 पॉइंट्ससह पहिल्या स्थानावर आहे.
 
दक्षिण आफ्रिका पाचही सामने खेळला आहे. त्यानंतर त्यांच्या खात्यात पाच पॉइंट आहेत.
 
अनपेक्षित विजय
आज पाकिस्तान आणि बांगलादेशचा सामना आहे. या सामन्याच्या निकालानंतर सेमी फायनलमधल्या दुसऱ्या संघाचं नाव निश्चित होईल.
 
वर्ल्डकप स्पर्धेत रविवार सकाळी नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेसारख्या मातब्बर संघाला नमवण्याची किमया केली. नेदरलँड्सच्या अनपेक्षित विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचं सेमी फायनलमध्ये प्रवेशाचं स्वप्न धुळीस मिळालं आणि त्यांच्यावर स्पर्धेतून बाद होण्याची नामुष्की ओढवली.
 
दुसरीकडे दक्षिण आफ्रिका स्पर्धेतून बाहेर गेल्याने भारतीय संघाचा सेमी फायनलचा प्रवेश पक्का झाला आहे. रविवारी तीन लढती होत आहेत. यातून दुसऱ्या गटातून सेमी फायनलला कोण जाणार हे पक्कं होणार होतं. आफ्रिकेच्या पराभवामुळे गटातली समीकरणं पूर्णत: बदलली असून आता बांगलादेश-पाकिस्तान लढतीतील विजयी संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरेल.
 
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. नेदरलँड्सतर्फे कोणीही अर्धशतकी खेळी केली नाही पण छोट्या आणि उपयुक्त खेळी केल्या. कॉलिन अकरमनने सर्वाधिक 41 रन्सची खेळी केली. अनुभवी टॉम कूपरने 35 रन्स करत त्याला चांगली साथ दिली.
 
ओपनर स्टीफन मायबर्गने 37 तर मॅक्स ओ दौदने 29 रन्स केल्या. नेदरलँड्सने 158 रन्सची मजल मारली. दक्षिण आफ्रिकेची बॉलिंग स्पर्धेतली सर्वोत्तम मानली जात होती कारण त्यांच्या ताफ्यात पाच भेदक फास्ट बॉलर आणि दोन दर्जेदार स्पिनर होते.
 
नेदरलँड्सच्या शिस्तबद्ध बॉलिंग आणि सुरेख अशा फिल्डिंगसमोर दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समननी नांगी टाकली. दक्षिण आफ्रिकेने सातत्याने विकेट्स गमावल्या. एकाही बॅट्समनला मोठी खेळी साकारता आली नाही. हेनरिच लासेनने 21 तर तेंबा बावूमाने 20 रन्स केल्या.
 
ब्रँडन ग्लोव्हरने 9 रन्सच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेत आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडले. बॅस डी लीडने 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.
 
स्पर्धा सुरू होण्याआधीपासून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावमूच्या संघातील समावेशावर टीका होत होती. बावूला रन्ससाठी झगडत होता. ट्वेन्टी-20 सारख्या प्रकारात स्ट्राईकरेट महत्चाचा असतो.
 
बावूमा टेस्ट प्रकारात चांगला खेळतो पण ट्वेन्टीमध्ये कमीत कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त रन्स करण्याचं कौशल्य नसल्याचं स्पष्ट झालं होतं. बावूमाने स्वत:ला वगळावं अशीही मागणी होत होती.
 
रिझा हेन्ड्रिंक्ससारख्या फॉर्मात असलेल्या खेळाडूला डावलून बावूमा खेळत असल्याने माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. नेदरलँड्सविरुद्धच्या पराभवामुळे बावूमाचं कर्णधार म्हणून अस्तित्व धोक्यात आलं आहे.
 
ट्वेन्टी प्रकारात दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स 2014 मध्ये आमनेसामने आलं होतं. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली होती. मात्र आज नेदरलँड्सने सर्वांगीण चांगला खेळ करत आफ्रिकेला निरुत्तर केलं.
 
झिम्बाब्वेविरुद्धची लढत रद्द होणं पडलं महागात
दक्षिण आफ्रिकेची झिम्बाब्वेविरुद्धची लढत पावसामुळे रद्द करावी लागली होती. पावसाने सातत्याने बाधा आणलेल्या त्या मॅचमध्ये झिम्बाब्वेने 9 ओव्हर्समध्ये 79 रन्सची मजल मारली. आफ्रिकेने क्विंटन डी कॉकच्या वादळी खेळीच्या बळावर 3 ओव्हर्समध्येच बिनबाद 51 अशी सुरुवात केली होती. आफ्रिकेचा विजय स्पष्ट दिसत असताना पुन्हा पाऊस आला.
 
निकालासाठी ठराविक ओव्हर्सचा खेळ पूर्ण होणं आवश्यक असतं. आणखी एक ओव्हर खरंतर बॉल जरी पडला असता तरी आफ्रिकेला विजयी घोषित करण्यात आलं असतं. पण मॅच रद्द झाली आणि दोन्ही संघांना एकेक गुण मिळाला. या मॅचमध्ये विजय मिळाला असता तर दक्षिण आफ्रिकेसाठी चित्र वेगळं असतं.
 
बांगलादेशावर दणदणीत विजय
रायली रुसोच्या शतकी खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा धुव्वा उडवला. आफ्रिकेने 205 रन्सचा डोंगर उभारला. बांगलादेशचा डाव 101 धावातच आटोपला. अँनरिक नॉर्कियाने 4 विकेट्स घेतल्या.
 
भारताविरुद्ध दिमाखदार विजय
भारतासारख्या तुल्यबळ संघाला नमवत दक्षिण आफ्रिकेने जेतेपदासाठी दावेदार असल्याचं सिद्ध केलं होतं. आफ्रिकेने भारताला अवघ्या 133 रन्समध्येच रोखलं. सूर्यकुमारच्या 68 रन्सचा अपवाद वगळता अन्य बॅट्समनला मोठी खेळी करता आली नाही. प्रत्युत्तरादाखल खेळताना आफ्रिकेची सुरुवातही डळमळीत झाली पण डेव्हिड मिलर आणि एडन मारक्रम यांच्या भागीदारीने आफ्रिकेला विजय मिळवून दिला.
 
पाकिस्तानविरुद्ध पराभूत
पाकिस्तानविरुद्ध दक्षिण आफ्रिकेला पराभवाला सामोरं जावं लागलं. चांगली सुरुवात करूनही पाकिस्तानने 185 रन्सची मजल मारली. पावसामुळे हे लक्ष्य बदलण्यात आलं. मात्र पाकिस्तानची चांगली बॉलिंग आणि रनरेटचं दडपण यापुढे दक्षिण आफ्रिकेने सपशेल शरणागती पत्करली.

Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

मोहम्मद शमी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात सामील होणार

बीसीसीआयच्या आक्षेपानंतर आयसीसीने ट्रॉफी टूरचे वेळापत्रक बदलले

भारतीय कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा एका गोंडस मुलाचे बाबा बनले

IND vs SA : भारताने दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी पराभव केला,मालिका 3-1 ने जिंकली

टीम इंडियाने चौथ्या टी-20 सामन्यात विक्रमांची मालिका रचली

पुढील लेख
Show comments